Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

किसन वीर महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी 'स्वसंरक्षण प्रशिक्षण' कार्यशाळा.

 किसन वीर महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी 'स्वसंरक्षण प्रशिक्षण' कार्यशाळा.

 ---------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

वाई प्रतिनिधी

 कमलेश ढेकाणे 

---------------------------

 वाई : येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयामध्ये महिला सक्षमीकरण कक्षामार्फत एक दिवसीय 'स्वसंरक्षण प्रशिक्षण' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे प्रमुख प्रशिक्षक *श्री.विशाल आबासाहेब कुमठे* यांनी आपल्या समाजातील लहान मुली, महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचे गांभीर्य सांगून विद्यार्थिनींनी स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत प्रात्यक्षिकांद्वारे सखोल माहिती दिली. या कार्यशाळेचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. सुनिल सावंत यांनी स्वसंरक्षण या विषयाची गरज समजावून सांगितली. या कार्यशाळेस प्रा. डॉ. भानुदास आगेडकर, कॅप्टन डॉ. समीर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मनिषा शेवाळे यांनी केले. प्रा. दिक्षा मोरे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. शलाका गुजर यांनी आभार प्रदर्शन केले. प्रा. सुमती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यशाळेत महिला सक्षमीकरण कक्षाच्या सर्व सदस्या व कला, वाणिज्य, विज्ञान व बी. सी. ए. शाखांमधील विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. या कार्यशाळेच्या संयोजनासाठी डॉ. प्रेमा यादव, प्रा. रेश्माबानो मुलाणी व प्रा. निलम भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments