Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

स्व. माणिक पोदार लर्न स्कूल व पोदार जम्बो किड्स यांचे स्नेहसंम्मेलन उत्साहात साजरे.

 स्व. माणिक पोदार लर्न स्कूल व पोदार जम्बो किड्स यांचे स्नेहसंम्मेलन उत्साहात साजरे.

-----------------------------

 फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर 

-----------------------------

स्व. माणिक पोदार लर्न स्कूल वाढोणा येथे हुनर हमारा वार्षिक स्नेहसंम्मेलन उत्साहात पार पाडले.अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शाळेच्या वतीने दरवर्षी स्नेहसंम्मेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी दि.28 जानेवारी रोजी शाळेत हुनर हमारा या कार्यक्रमाचे भव्य आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले होते.विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांचा विकास यामधून दिसून आला.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची कला सादरीकरण करण्याची संधी मिळाली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे अध्यक्ष विनायकराव जाधव,, ज्योती जाधव,सचिन मापारी, सीमा मापारी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, संतोष आघाव पी. एस. आय गोरेगाव, अजय बांगर अध्यक्ष माऊंट लिटेरा झी स्कूल, हिंगोली. सुनील कदम अध्यक्ष वर्ल्ड स्कूल वाशिम, जगदीश काळे, अध्यक्ष विदर्भ पब्लिक स्कूल,मालेगाव हे उपस्थित होते.तसेच शाळेचे प्राचार्य बस्वराज जगाये, .नर्गिस अंजुम मुख्याध्यापिका पोदार जम्बो किड्स, रिसोड, शारदा अंभोरे सेंटर हेड, सेनगाव मुख्य व्यवस्थापक पवन जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व माणिकराव जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलंन व हारार्पण करण्यात आले.कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेतील विद्यार्थी मेहुल बगडिया व आरुषी देशमुख स्वराली देशमुख, तेजल छित्तरका यांनी केली. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रस्तावनेच्या माध्यमातून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून सांगितली. तसेच आपल्या जीवनातील स्नेहसंमेलनाचे महत्त्व काय असते हे सांगितले. यासोबतच संपूर्ण कार्यक्रमांमध्ये वेदांत शिंदे, कृष्णा अग्रवाल,दर्शन बनसोड,अक्षद खानझोडे,देवयानी, श्रावणी साखरे, श्रावणी सरकटे, रिया डोखले, प्राजक्ता गोरे, तृप्ती पोपळघट, श्वेता पोपळघट, पूर्वा वावगे, या शाळेतील विद्यार्थ्यांनीच सूत्रसंचालन करून सर्वांचे मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी शाळा नेहमीच अग्रेसर असते. तसेच वर्षभर सुद्धा शैक्षणिक वर्षांमध्ये शाळेच्या वतीने अभ्यासाबरोबरच इतर विविध सांस्कृतिक उपक्रम तसेच सामाजिक उपक्रम शाळेच्या परिसरामध्ये घेण्यात येतात. शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी मार्गदर्शन करण्यात येतेच परंतु अभ्यासाशिवाय सुद्धा एक दर्जेदार विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न नेहमीच सुरू असतात. यास विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून शाळेची वाटचाल सुरू असते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी शाळा नेहमी प्रयत्नशील असते. या हुनर हमारा स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन पालकांसमोर करण्यात आले.यासोबतच अध्यक्षीय भाषणातून विनायकराव जाधव यांनी शाळेच्या स्थापनेपासून ते आज पर्यंतचा आलेख सर्वांसमोर मांडला आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणा देण्यासाठी मी कटीबद्ध आहे. शाळेच्या माध्यमातून जे काही विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी जे प्रयत्न असतील ते नेहमीच करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी आपल्या भाषणातून दिली. तसेच लॉकडाऊन मध्ये सुद्धा शाळेच्या वतीने कोणत्याही प्रकारचा अभ्यासामध्ये खंड न पडू देता नियमितपणे विद्यार्थ्यांचे शिक्षण आम्ही सुरू ठेवले असे प्रतिपादन त्यांनी केले. यापुढेही परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही सकारात्मक राहू असा विश्वास त्यांनी पालकांना बोलून दाखविला. या सोबतच प्रमुख पाहुण्याचे भाषण संपन्न झाले तहसीलदार तेजनकर मॅडम यांनी शाळेच्या होणाऱ्या प्रगतीच्या वाटचालीस शुभेच्छा देत विद्यार्थी व पालकांचे कौतुक केले. तसेच शायनी आयोजित केलेल्या पुनर हमारा या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात. ग्रामीण भागामध्ये दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून पोदार स्कूल ला एक वेगळी ओळख मिळालेली आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. यासोबतच शाळेतील प्राचार्य बस्वराज गजाये व मुख्याध्यापिका नर्गिस अंजुम यांनी समायोचित भाषणे करून शाळेच्या वाटचाली बद्दल उपस्थित पालकांन माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांची प्रगती शाळेच्या वतीने कशा प्रकारे साध्य केले जाते हे विशद केले. यासोबतच पालकांनी शाळेच्या वाटचाली विषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये वर्षा नागरे, माधुरी देशमुख, विनोद कावळे, वंदना जाधव, गौरी काष्टे, नीलिमा इंगोले यांनी शाळेची वाटचाल कशी सुरु आहे. हे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्या मधून आपल्या अंगी असलेले कलाविष्कार सर्वांसमोर सादरीकरण केले. कार्यक्रमांमध्ये पोदार जम्बो किड्स, रिसोड व सेनगाव येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा कार्यक्रमाचा आनंद लुटला.स्नेहसम्मेलनात विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य करून सर्वांची मने जिंकली यामध्ये बादशहा, चिटीया कलाया, मै निकला गडी लेके,गंगा नदी, महाभारत, विठ्ठल पालखी रामायण, पावन खिंड, हॉरर थीम, सर्कस, ओल्ड इज गोल्ड,या गाण्यावर बहारदार नृत्य सादरीकरण केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेची विद्यार्थिनी स्नेहा जमधाडे हिने मानले.

Post a Comment

0 Comments