Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

चैनीसाठी चोऱ्या करणाऱ्या तिघांना अटक साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त.

 चैनीसाठी चोऱ्या करणाऱ्या तिघांना अटक साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार

---------------------------

शाहूपुरी पोलिसांकडून सुमारे साडे तीन लाखांचे सोन्याचे दागिने जप्त,तिघा आरोपींना अटक.

कोल्हापूर:- रुईकर कॉलनी येथील "पृथ्वीराज धैर्यशील पाटील"यांच्या घरामध्ये झालेल्या चोरीचा छडा शाहूपुरी पोलिसांनी लावला आहे. याप्रकरणी रोहित महेश सावंत व.व.२३ रा. विचारेमाळ, सदरबाजार कोल्हापूर. रोहन अरुण कांबळे व.व.२० रा. विचारेमाळ सदर बाजार, जस्सी सुधीर चांदणे व.व. २३ रा.जुना बुधवार पेठ, ब्रम्हपुरी कोल्हापूर अटक केली.त्यांचेकडून ३ लाख ५५ हजार ५०० रुपयांचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
शाहुपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रुईकर कॉलनी येथे राहणारे "पृथ्वीराज धैर्यशील पाटील" यांनी त्यांच्या राहत्या राज बंगल्यामध्ये सोन्याचे दागिने चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती.याबाबत त्यांनी राहते घरी काम करणारा कामगार रोहित महेश सावंत व त्यांचे मित्र रोहन कांबळे व जस्सी चांदणे यांनी चोरी केलेचा संशय घेऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.त्याप्रमाणे शाहूपुरी पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत असताना सदर गुन्ह्यातील संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत प्रथम त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता चोरीची कबुली दिली.आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत. यामध्ये १,०५,०००/- रु. किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या, १,६५,०००/- रु. किमतीचा वजनाचा एक सोन्याचा हार. ५०० रु. किमतीचा एक ग्रम सोन्याची चेन, १५,००० रू किमतीची सोन्याची अंगठी एक,२०,००० रू किमतीची त्यात सोन्याच्या कानातील दोन रींगा. २५,००० रू किमतीचे सोन्याच्या कानातील दोन बाळ्या,२५,०००रू किमतीच्या सोन्याची एक वळ, ,असा एकूण- ३,५५,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर चोरी हि त्यांनी लोकांची देणी आणि चैनीसाठी केली असल्याचे आरोपींनी सांगितले.ते दहावी पर्यंतच शिकलेले असून ते गाड्या सर्व्हिसिंग चे काम करतात. त्यातूनच त्यांची ओळख होऊन मैत्री झाली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सो महेंद्र पंडित व उपविभागीय पोलीस अधिकारी शहर अजित टिके यांचे सुचने प्रमाणे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे, सहाय्यक फौजदार संदीप जाधव, पोलीस अंमलदार मिलिंद बांगर, महेश पाटील, विकास चौगुले, बाबा ढाकणे, रवि आंबेकर, लखन पाटील व शुभम संकपाळ यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments