Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

ट्रक दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू रिसोड शहरातील घटना.

 ट्रक दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू रिसोड शहरातील घटना.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 रिसोड प्रतिनिधी 

रणजीत ठाकुर 

------------------------------------

कुणीतरी एका अज्ञात चार चाकी वाहन चालकाने त्याच्या वाहनाचा दरवाजा उघडला,लगेच मागून येत असलेल्या एक दुचाकी स्वाराला त्याचा धक्का लागला व दुचाकी स्वार थेट ट्रकच्या चाकाखाली आला. अत्यंत मन हेलावणारी ही दुर्दैवी घटना आज दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळी 11:45 वाजता रिसोड लोणी मार्गावर डॉक्टर जितेंद्र गवळी यांच्या दवाखान्यासमोर घडली. सुनील धूत वय 40 असे मृतकाचे नाव असून तो रिसोड शहरातील एक प्रसिद्ध बँकिंग एजंट होते. यासह सुनील धूत हे रिसोड तालुका भाजपाचे जुने व हाडाचे कार्यकर्ते होते. याबाबत माहिती अशी की सुनील धूत हे आपले बँकिंग चे काम करण्यासाठी जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या एका चार चाकी वाहनाधारकाने दरवाजा उघडला असता त्यावेळेस सुनील धूत हे रस्त्याने जात असताना दरवाज्याचा धक्का लागला. दुर्दैवाने तिथून एक ट्रकही सिमेंट घेऊन जात होता.धक्का लागताच सुनील धूत हे दुचाकीवरून ट्रकच्या खाली फेकले गेले व त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटना घडतात या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली. यादरम्यान रिसोड पोलीस घटनास्थळी पोहोचून घटनेची पाहणी केली व मृतदेह ॲम्बुलन्स द्वारे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला .

Post a Comment

0 Comments