Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विद्या मंदीर कोनोली तर्फ असंडोली (ता. राधानगरी )शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा.

 विद्या मंदीर कोनोली तर्फ असंडोली (ता. राधानगरी )शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा.

--------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

पन्हाळा प्रतिनिधी 

आशिष पाटील        

--------------------------------------------

विद्या मंदीर कोनोली तर्फ असंडोली शाळेची कु. सोफिया आलम टिवळे हिने जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धेत  मोठ्या गटातून 100 मी रनिंग मध्ये तृतीय क्रमांक पटकावला. आणि 200 मी रनिंग मध्ये उत्तेजनार्थ आली आहे. तिला मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.तसेच  कु. जोया आलम टिवळे ही देखील लहान गटातून 100 मी रनिंग मध्ये   उत्तेजनार्थ आली आहे. या दोघींनाही  तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा  बी एम कासार साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा विजय जांगणुरे साहेब, मा. कडगावकर साहेब, केंद्रप्रमुख मा के एस लोटेकर सर, मुख्याध्यापक मा डी एम पोवार सर यांची प्रेरणा मिळाली तसेच क्रिडा शिक्षक श्री आनंदा पाटील , श्री सुहास पाटील , श्री डी एस पाटील, श्री आनंदा गडकर, सौ. नंदा जाधव, कु. पुजा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य,  ग्रामपंचायचती चे सर्व  पदाधिकारी सर्व ग्रामस्थ यांचे प्रोत्साहन मिळाले.

Post a Comment

0 Comments