Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर यांच्याकडून फौजदारी गुन्हे दाखल झाल्याने बेकायदेशीर बांधकाम धारकात खळबळ..

 नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर यांच्याकडून फौजदारी गुन्हे दाखल झाल्याने बेकायदेशीर बांधकाम धारकात खळबळ..

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

---------------------------------

गांधीनगर वळीवडे उंचगाव गडमुडशींगी ग्रामपंचायतीचा हद्दीत विनापरवाना बेकायदेशीर बांधकामावर काही सामाजिक कार्यकर्त्यानी ति बांधकामे थांबवण्यासाठी तक्रारी नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर यांच्या कडे केल्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर यांच्याकडून स्थळी पाहणी पंचनामा केला होता व त्या बांधकाम धारकांना नोटीसा बजावण्यात येऊन त्या बांधकाम धारकांना कामे थांबवण्याचे नोटीसा द्वारे कळीवण्यात आले होते परंतु त्या नोटीसाना बेकायदेशीर बांधकाम धारकांनी केराची टोपली दाखवली होती


अश्या बांधकाम धारकांसह बांधकाम करणाऱ्या कॉन्टॅक्टरवरही नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूर यांच्याकडून फौजदारी गुन्हे दाखल झाल्याने बेकायदेशीर बांधकाम धारकात खळबळ उडाली आहे 

वरील नमूद गावच्या हद्दीत शेकडो विनापरवाना बांधकामे सुरु असून त्यावर लवकर कारवाई करण्यात येईल असे नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कोल्हापूरचे नगर रचनाकार आधीकारी हंबीरराव झांबरे घ यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments