जिंगल्सद्वारे प्रत्येक शेतकऱ्यांच्या कानात गुंजणार कृषि योजनेची माहिती.
जिंगल्सद्वारे प्रत्येक शेतकऱ्यांच्या कानात गुंजणार कृषि योजनेची माहिती.
------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
लोहा प्रतिनिधि
अंबादास पवार
------------------------
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते जिंगल्सचे उद्घाटन संपन्न.
नांदेड दि. 4 : कृषि विभागामार्फत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेविषयक जिंगल्स तयार करण्यात आले आहे. या जिंगल्सद्वारे प्रचार प्रसिद्धीसाठी प्रत्येक गाव व तालुका स्तरावर प्रत्येक मंदिर, विहार, चर्च, मस्जिद तसेच आठवडी बाजार येथे कृषि सहाय्यकांमार्फत नागरिकांना या योजनेची माहिती ऐकविण्याचा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग योजनेसाठी तयार केलेले जिंगल्सचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे उपस्थित होते. यावेळी हदगाव विधानसभा मतदार संघामध्ये योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी कृषि विभागाला सहाय्य करून असे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगितले. योजनेविषयक माहिती व जिंगल्स गाव पातळीवर, तालुका स्तरावर कशा प्रकारे कार्यरत राहील याची माहिती भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी यावेळी दिली.
सद्यस्थितीत वैयक्तिक मालकीच्या सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी 183 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांची एकुण किंमत 21 कोटी 62 लाख 57 हजार रुपये आहे. यामध्ये बँकाकडून 9 कोटी 93 लाख 23 हजार रुपये कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून 4 कोटी 93 लाख 62 हजार रूपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.
या माध्यमातून लसुण, आद्रक पेस्ट, चिप्स, मसाले, दाळे, तेलघाणा, पापड, शेवया, चिक्की, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, गुळ उद्योग इत्यादी सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात उभारण्यात आले आहे. अर्जा संबंधीत माहिती ही www.mofpi.nic.in व PMFME या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय नांदेड दूरध्वनी क्रमांक 02462-284252 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या योजनेचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment