Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुरगूड येथील जनावरांच्या बाजारात सुविधा पुरवा.शेतकरी व व्यापाऱ्यांचे नगरपरिषदेला निवेदन.

 मुरगूड येथील जनावरांच्या बाजारात सुविधा पुरवा.शेतकरी व व्यापाऱ्यांचे नगरपरिषदेला निवेदन.

--------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड प्रतिनिधी

 जोतीराम कुंभार

--------------------------

   मुरगूडमधे दर मंगळवारी मोठा जनावरांचा बाजार भरतो.बाजारात तळ कोकण,कर्नाटक व महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणांहून येणाऱ्या जनावरांचा बाजार भरतो.

   बाजारात गायी, म्हशींचा मोठा व्यापार होतो यावेळी गाई म्हशींना उभे करण्यासाठी किंवा वाहनातून चढ उतर करण्यासाठी ठिय्ये करणे आवश्यक आहे.

त्याशिवाय बाजारात दलदल असलेल्या ठिकानी  मुरूम टाकून रस्ता स्वच्छ करणे

 तसेच बाजारातील अंतर्गत रस्ते आणि पाण्याच्या टाक्या यांची सुविधा होणे गरजेचे आहे तसेच जनावरांच्या बाजारामुळे नगरपरिषदेला चांगला महसुलही मिळेल

       वरील सुविधा बाजारात तातडीने उपलब्ध व्हाव्यात असे निवेदन जनावर व्यापारी व शेतकऱ्यांनी मुरगूड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घार्गे यांच्याकडे दिले आहे. यावेळी घार्गे यांनी पूर्तता करण्याचे आश्वासन दिले

Post a Comment

0 Comments