Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

युती केली तरच टीकाल नाहीतर जेलमध्ये जाल-प्रकाश आंबेडकर.

 युती केली तरच टीकाल नाहीतर जेलमध्ये जाल-प्रकाश आंबेडकर.

-----------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

पी.एन.देशमुख.

अमरावती प्रतिनिधी.

---------------------------------------

अमरावती.

काँग्रेससह इतर सर्वच महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मानगुटीवर कारवाईची तलवार लटकून आहे. त्यामुळे जर भीत भीत निवडणुकीला समोर जाल तर सर्वांच्याच मानगुटीवर तलवार कोसळले आणि सोनिया गांधी पासून सर्व जेलमध्ये जातील. वंचितचा एकही नेता जेलमध्ये जाणार नाही. त्यामुळे युतीमध्ये लढाल तरच टीका नाही तर सर्व जेलमध्ये जाल अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी जाहीर सभेमध्ये व्यक्त केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने अमरावतीमध्ये जाहीर सभेतून एक प्रकारची शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील सायन्स कोर्स मैदानावर ही विराट जाहीर सभा पार पडली. यावेळी प्रकाश आंबेडकरांना ऐकायला लाखोंच्या संख्येने वंचित कार्यकर्ते व पदाधिकारी आले होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, दोन वर्षापासून महाविकास आघाडीत लोकसभेच्या ४८ वाटपा संदर्भात समझोता झालेला नाही. त्यामुळे खरंच यांना बीजेपीला हरवायचे आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. ते म्हणतात वंचितीला आम्ही दोन जागा देतो, त्यामुळे त्या जागा कोणत्या यासंदर्भात जेव्हा काँग्रेसवाल्यांना विचारणा केली तर म्हणतात, अजून आमचं ठरले नसल्याचे ते सांगतात. त्यामुळे जर बीजेपीला हरवायचं असेल तर युतीमध्ये तुम्हाला लढावं लागेल. वंचित तिला सोबत घेतलं तर ठीक नाहीतर आम्ही सर्व ४८ जागा ही लढविण्याची तयारी आहे. बीजेपी ची फक्त एक कमी कार्यक्रम सुरू असून त्यांना फक्त देशात एकच पक्ष ठेवायचा आहे. देशात राजकीय पक्ष टिकले पाहिजे. राजकीय पक्षात राहिले नाही तर देशातील लोकशाहीचा संपुष्टात येईल आम्ही कधीही सत्तेत नव्हतो त्यामुळे चोरी करण्याचा प्रश्नच नाही, जे सत्तेत होते त्यांनी चोरी केल्याचे मोदी सांगतात. त्यामुळे निवडणुका संपल्या सत्ता भोगणाऱ्यांना सर्वांना जेलमध्ये जावे लागेल. युती करायची नाही म्हणून ते बळीचा बकरा शोधत आहे. परंतु त्या प्रकारे गरीब मराठ्यांचा उपयोग केला त्या प्रकारे वंचित यांचा वापर करण्याचा विचार असेल तर बीजेपी सोबत तुम्हालाही काढल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिला.

Post a Comment

0 Comments