२६ जानेवारीला दोन लाख साखर पोत्याचे पुजन.
२६ जानेवारीला दोन लाख साखर पोत्याचे पुजन.
----------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मेढा प्रतिनिधी
प्रमोद पंडीत
----------------------------------------------------
(भणंग ) सहकार महर्षी माजी आमदार स्व. लालसिंगराव शिंदे ( काका ) यांच्या ९८ व्या जयंती निमित्त अजिक्यतारा - प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या सन २०२३ ते २०२४ गळीत हंगामाच्या दोन लाख साखर पोत्यांचे पुजन करण्याचे उदिष्ठ आहे .
अजिक्यतारा प्रतापगड साखर उदयोग समुहाच्या वतीने रह जानेवारी २०२४ या प्रजास्ताक दिनादिवशी दोन लाख साखर पोत्यांची पुजन संपन्न होणार आहे .
सहकार महर्षि माजी आमदार स्वर्गीय लालसिंगराव शिंदे ( काका ) यांची ९ ८ वी जयंती २६ जानेवारी रोजी साजरी होत असून या जयंती दिनी अजिक्यतारा - प्रतापगड साखर उदयोग समूहच्या सन २०२३ / २०२४ गळीत हंगामात दोन लाख साखर पोत्यांचे पूजन संपन्न होणार आहे आणि जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . व भव्य - रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्रतापगड कारखानाचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी यावेळी दिली .
रक्तदान शिबीर सकाळी ९ ते ४ यावेळेत होणार आहे ' तर दोन लाख साखर पोत्यांचे पूजन आमदार श्रीमंत छत्रपति शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे तेव्ह या कार्याक्रमास हजार राहण्याचे आवाहन प्रतापगड कारखान्याचे चेअरमन शैरभ बाबा शिंदे यांनी केले आहे .
Comments
Post a Comment