Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

दत्तात्रय उगले यांची महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथे अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती.

 दत्तात्रय उगले यांची महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथे अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती.

---------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

गारगोटी प्रतिनिधी

---------------------------

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कार्यकारी परिषद सदस्य बिद्री कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय उगले यांची महाराष्ट्र कृष शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथे अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे.


महाराष्ट्रात एकूण चार कृषी विद्यापीठे असून या चारही संस्थामध्ये प्रभावी समन्वय व सुसूत्रता साधण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठांच्या कार्याचा आढावा घेणे, मूल्यमापन करणे, पर्यवेक्षण करणे आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कृषी परिषदेवर आहे. परिषदेचे काम अधिक प्रभावीपणे होण्यासाठी शिक्षण, संशोधन, विस्तार शिक्षण असे तीन मुख्य विभाग करण्यात आले आहेत. भविष्यकालीन कामासाठी धोरणात्मक तसेच कार्यवाही करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जातात. शेतीचा विकास आणि शेतक-यांची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी ही संस्था गेल्या 25 वर्षापासून अखंडपणे कार्यरत असून या संस्थेवर कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलेच प्रगतशील शेतकरी दत्तात्रय उगले यांची निवड करण्यात आली आहे.


श्री.उगले यांनी भुदरगड तालुक्यातील एक मोठे गाव असणाऱ्या मडिलगे बुद्रुक गावचे सलग 20 वर्षे सरपंच म्हणून काम केले आहे. तसेच ते बिद्री साखर कारखान्याचे संचालक देखील होते. त्यांनी सन 2003 ते 2005 संपुर्ण गाव हरीत क्रांतीमय केले आहे. ते सन 2021 पासून महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कार्यकारी परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. याकामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, कृषि मंत्री धनंजय मुंडे यांचे सहकार्य लाभले आहे.


 

Post a Comment

0 Comments