Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मानधन नको वेतन हवयं वडूज येथे अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा तहसील कचेरीवर आक्रोश मोर्चा.

 मानधन नको वेतन हवयं वडूज येथे अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा तहसील कचेरीवर आक्रोश मोर्चा.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

वडूज  प्रतिनिधी 

विक्रमसिंह काळे 

---------------------------

वडूज : अंगणवाडी सेविका - मदतनीस यांचा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू आहे. शासनाने या संपाची दखल घेतली नाही म्हणून खटाव तालुक्यातील सेविका - मदतनीस यांनी शेकडोच्या संगतीने येत वडूज तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा काढला . यावेळी आलारे आला मोर्चा आला , आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्चा खाली करा , मानधन नको वेतन हवयं या घोषणा बाजीने तहसील परिसर दणाणून गेला.

          प्रचंड घोषणा देत अंगणवाडी कर्मचारी महिलांनी वडूज तहसील कार्यालयावर मोर्चा काढत नायब तहसीलदार महेश गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर कर्मचार्यांनी आपल्या मनोगता मध्ये , मानधन नको वेतन हवयं ,सरकारचा दुटप्पी पणा लक्षात आल्याने आंदोलनाची तिव्रता वाढविणे काळाची गरज आहे. सरकारला सळो की पळो केले तरच आपले आणि आपले भवितव्य निश्चित होणार आहे. शासनाची मान्यता प्राप्त करून घेतल्या शिवाय योजना बाह्य काम अंगणवाडी कर्मचार्यांना यापुढे देण्यात येऊ नये. यासह अद्याप ही कोरोना भत्ता न मिळाल्याने तो दंड व्याजासहीत प्रोत्साहन भत्ता मिळणे आवश्यक आहे.

     याप्रंसगी विविध अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपली मनोगते व्यक्त केली .खटाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका , मदतनीस योची मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या .

Post a Comment

0 Comments