Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वाई "जीवनात संवेदनशील निरिक्षणातून स्वतः मध्ये सकारात्मक बदल घडते.

 वाई "जीवनात संवेदनशील निरिक्षणातून स्वतः मध्ये सकारात्मक बदल घडते.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 वाई प्रतिनिधी

 कमलेश ढेकाणे 

------------------------------

यशस्वी होता येते, या करिता सिंहाप्रमाणे आत्मविश्वास पूर्वक लक्ष्याचा पाठलाग केला पाहिजे", असे विचार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, कोल्हापुर विभागाचे सहसचिव श्री. डी. एस. पोवार यांनी मांडले. जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले होते. यावेळी व्यासपीठावर सचिव डॉ. जयवंतराव चौधरी, संचालक केशवराव पाडळे, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य विवेक सुपेकर, पर्यवेक्षक बाळासाहेब कोकरे व क्रीडा विभाग प्रमुख श्री. सचिन चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती.


श्री. डी. एस. पोवार पुढे म्हणाले " विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडी-निवडी व कौशल्ये ओळखून जीवनाचे लक्ष निश्चित करावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्यातील चांगल्या गोष्टी लक्षात आणून देण्यासाठी मार्गदर्शन करावे. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांना सामोरे जाताना प्रतिक्रिया व प्रतिसाद, निरिक्षण व संवेदनशीलता याचा योग्य मेळ घालत अतिरेक व विरोधाभास टाळून उन्नती साधली पाहिजे".


आपल्या अध्यक्षीय समारोपात श्री मदनदादा भोसले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. "विद्यार्थी जीवनातील क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार व त्याच्याशी निगडीत आठवणी या भविष्यात स्फूर्ती देत राहतात. जनता शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असून पारंपारिक शिक्षणाबरोबरच कौशल्य विकासासाठी अनेक उपक्रम आयोजित केले जात आहेत. विद्यार्थ्यांनी अशा संधीचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा", असे आवाहन त्यांनी केले.


कार्यक्रमाचे सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक देशभक्त आबासाहेब वीर व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाची पार्श्वभूमी व उज्ज्वल परंपरेची ओळख करुन दिली. शिक्षक प्रतिनिधी हरेश कारंडे यांनी प्रमुख पाहुण्याची ओळख करून दिली. उपप्राचार्य विवेक सुपेकर यांनी शैक्षणिक अहवाल बाचन केले. क्रीडाशिक्षक श्री. मदन जाधव यांनी क्रीडा अहवालाचे वाचन केले. श्री. नितिन कस्तुरे यांनी शैक्षणिक पारितोषिकांच्या यादीचे बाचन केले. श्री. सचिन चव्हाण यांनी क्रीडा पारितोषिकांच्या यादीचे वाचन केले. श्री. गणेश चव्हाण व नयना भोसले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी पर्यवेक्षक श्री. बाळासाहेब कोकरे यांनी आभार मानले.


कार्यक्रमास कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, पत्रकार, शिक्षकेतर कर्मचारी, सेवकवर्ग, व सेवानिवृत्त प्राध्यापक, विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने हजर होते.

Post a Comment

0 Comments