5000, रु लाच स्वीकारताना दोघांना अटक.
--------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
--------------------------------------
जयसिंगपूर:- जयसिंगपूर येथील डवरी वसाहतीत असलेल्या प्लॉटच्या क्षेत्रफळामध्ये तफावत असल्याने सदर क्षेत्र फळ दुरुस्त करून सातबारा उतारा देण्यासाठी आरोपी लोकसेवक तलाठी सजा जयसिंगपूर तालुका शिरोळ जि कोल्हापूर वर्ग 03 रा रुकडी तालुका हातकणंगले स्वप्नील वसंत राव घाटगे व.व.39
व महसुल सहाय्यक तहसीलदार कार्यालय शिरोळ वर्ग 03 लोकसेवक राजू नायकवडी या दोघांना 27500 रुपये लाच मागितली त्यापैकी 5000 रु लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले
हि कारवाई पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला.स पो फौ प्रकाश भंडारे,पो हे काॅ. अजय चव्हाण, विकास माने,पो ना सुधीर पाटील सचिन पाटील पो काॅ संदिप पवार चालक सूरज अपराध यांनी केली
0 Comments