फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
--------------------------------
तालुक्यातील स्वामी विवेकानंद माध्य. व उच्च माध्य. विद्यालय व्याड येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक जे पी भिसडे तर प्रमुख मार्गदर्शक शिक्षिका कु. दुर्गा घोगरे, प्रा. प्रवीण सरनाईक, रवि अंभोरे,जी एस घाटोळ, आर आर पवार उपस्थित होते.डॉ सी व्ही रमण यांच्या रमण परिणाम या शोध प्रबंधमुळे जागतिक स्तरावर विज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती झाली त्यामुळे रमण यांच्या स्मरणार्थ संपूर्ण भारत देशात 28 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जात असल्याचे आपल्या प्रास्ताविक मनोगतातून जी एस घाटोळ यांनी व्यक्त केले. तर दैनंदिन जीवनात आजच्या युगात सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत विज्ञानाचा संबंध येतो असे मनोगत दुर्गा घोगरे यांनी व्यक्त केले. तर प्रवीण सरनाईक यांनी विज्ञान हे दुधारी शस्त्र असून ते कसे वापरावे याचे आकलन असणे गरजेचे आहे.वैज्ञानिक संशोधणाचे जेवढे फायदे तेवढेच तोटे सुद्धा आहेत. विज्ञान शिक्षक रवि अंभोरे यांनी मार्गदर्शन करताना मागील दोनशे वर्षात झालेली वैज्ञानिक क्रांती उदाहरणासह विषद केली.आज प्रत्येक क्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर होतो आहे.यंत्रमुळे अवघड कामे सहज आणि सोपी झाली मात्र सामाजिक आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होऊन माणुसकी लोप पावत चालली आहे.भारत देशाला नैतिक मूल्यांची आणि संस्काराची व संत परंपरेची मोठी देणगी मिळाली आहे त्याची सांगड विज्ञानाशी घालून देशाची सांस्कृतिक व वैज्ञानिक प्रगती नवीन पिढीने साधावी असे आवाहन केले. तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जे पी भिसडे यांनी विज्ञान म्हणजे तर्कशुद्ध ज्ञान असून त्यामुळे अंधश्रद्धा व बुवाबाजीला अजिबात थारा भेटत नाही.वैज्ञानिक शोध ही सतत चालणारी प्रक्रिया असून गरजेनुसार नवनवीन शोध लागत राहतात. त्यामुळे विद्यार्थांनी विज्ञान विषय केवळ पुस्तकातून न शिकता तो अवतीभोंवतीच्या अनुभूतीतुन समजून घ्यावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक गणेश हेंबाडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जी एस घाटोळ, नरेश बचाटे,गणेश बनसोड, भारत माकोडे यांनी विशेष सहकार्य केले.
0 Comments