Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मा.श्री.सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांचे हस्ते गुन्हयातील तक्रारदारांना त्यांचे चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिणे हस्तांतरीत.

 मा.श्री.सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांचे हस्ते गुन्हयातील तक्रारदारांना त्यांचे चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिणे हस्तांतरीत.

--------------------‐-------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी

 अमर इंदलकर.

 ---------------------------------------

    मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी दि.२१/०२/२०२४ ते दि.२४/०२/२०२४ या कालावधीत सातारा जिल्हा पोलीस दलाचा वार्षिक तपासणी कार्यक्रम आयोजित केला असून त्याकरीता ते सातारा जिल्हयामध्ये हजर आहेत.

       श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी माहे नोव्हेंबर २०२२ पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकलचोरी, इतर चोरी असे एकूण १६३ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले असून नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यांपैकी ४४२ तोळे सोने (४ किलो ४२० ग्रॅम) असा एकूण २,७०,८०,७००/- रुपये (दोन कोटी, सत्तर लाख, ऐशी हजार, सातशे रुपये) किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.

     मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांच्या वार्षिक तपासणीचे औचित्य साधून श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांचे हस्ते गुन्हयातील तक्रारदारांना सोन्या चांदीचे दागिणे परत करण्याचा कार्यक्रम आयोजित केला तो कार्यक्रम दि.२२/०२/२०२४ रोजी शिवतेज हॉल सातारा येथे घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सातारा जिल्हयातील एकूण ७० तक्रारदारांना त्यांना त्यांचे चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिणे मा. श्री. सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांचे हस्ते हस्तांतरीत करण्यात आले. नमुद कार्यक्रमात एकूण ४ किलो ४२० ग्रॅम सोन्याचे दागिणे तक्रारदारांना हस्तांतरीत करण्यात आलेले आहेत. त्यावेळी तक्रारदार यांनी सोन्या चांदीचे दागिणे परत मिळाल्याने समाधान व्यक्त केले व सातारा जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचे कौतूक करुन मा.श्री. सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर, यांचे आभार मानले.

         मा.श्री.सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली सदरचा कार्यक्रम पार पडला असून या कार्यक्रमास श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. अतुल सबनीस पोलीस उपअधीक्षक गृह, श्री. अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा तसेच सातारा जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार हजर होते.

Post a Comment

0 Comments