Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सातारच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट मध्ये वाईच्या किसन वीरच्या बी.सी.ए च्या मुलांचा डंका.

 सातारच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट मध्ये वाईच्या किसन वीरच्या बी.सी.ए च्या मुलांचा डंका.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

वाई प्रतिनिधी

कमलेश ढेकाणे 

---------------------------------

वाईः सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये राज्यस्तरीय तंत्रज्ञान TECH++ 2K24” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या राज्यस्तरीय तंत्रज्ञान स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सांगली, सातारा व कोल्हापूर, तसेच सोलापूर व पुणे अशा अन्य जिल्ह्यातून विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. या तंत्रज्ञान स्पर्धेमध्ये सी प्लस प्लस प्रोग्रामिंग, पोस्टर प्रेझेंटेशन, पी.पी.टी. प्रेझेंटेशन, टेक्नो क्विज इत्यादी प्रकारच्या विविध स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये किसन वीर कॉलेज मधील बी.सी.ए विभागातील २८ विध्यार्थी विविध स्पर्धेत सहभागी झाले होते. यापैकी पी.पी.टी. प्रेझेंटेशन मध्ये रोषण शिर्के याचा प्रथम क्रमांक आला. पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये अमृता घाटे आणि सुमित बाबर यांचा प्रथम क्रमांक आणि प्रणव महागावकर आणि किरण पांगारे यांचा द्वितीय क्रमांक आला. सी प्लस प्लस प्रोग्रामिंगमध्ये रोहन भोसले आणि अथर्व कायंगुडे यांचा तृतीय क्रमांक आणि अस्मिता शेवते आणि प्राची राजपुरे यांचा पाचवा क्रमांक आला. त्याचबरोबर किसन वीर महाविद्यालयाला उत्कृष्ट कॉलेज म्हणून चॅम्पियन ट्रॉफी मिळाली.

या नेत्रदीपक यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, प्राचार्य डाॅ गुरुनाथ फगरे, बी.सी.ए चे समन्वयक डाॅ सुनील सावंत आणि सर्व शिक्षकांनी सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments