पक्ष प्रवेश : बिभवी आणि वाळंज वाडी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचे शिवसेना शिंदे पक्षात पक्षांतर.
-----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मेढा प्रतिनिधी
प्रमोद पंडीत
-----------------------------
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून लोकहिताचे अनेक निर्णय घेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावरती प्रभावित होऊन बिभवी आणि वाळजवाडी ग्रामपंचायतीचा बोंडारवाडी धरणाकरिता व गावच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व सातारा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
महाबळेश्वर येथे शंभर व्या विभागीय नाट्य परिषदेच्या उद्घाटनासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आले होते त्यावेळी वरील प्रवेश झाले त्यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव सातारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख एकनाथजी ओंबळे उपजिल्हाप्रमुख संदीप पवार तालुकाप्रमुख शांताराम कदम समीर गोळे वैद्यकीय मदत पेक्षा सातारा समन्वयक प्रशांत जुनघरे विभाग प्रमुख नंदकुमार चिकणे तसेच वाई विधानसभा प्रमुख विकास शिंदे उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने खंडाळा तालुकाप्रमुख भूषण शिंदे यांच्या उपस्थितीत बिभवी गावचे माजी सरपंच वैशाली पांडुरंग वाघ , पांडुरंग वाघ,उपसरपंच काजल सुहास परीहर ,ग्रामपंचायत सदस्य कांताराम यदु शिंदे,स्वाती शरद देशमुख,आरती अमोल बांदल,विकास सेवा सोसायटीचे सदस्य अनिल महाडिक तंटा मुक्तीचे अध्यक्ष संपत बापू भणगे सामजिक कार्यकर्ते वसंत पवार,शाखाप्रमुख शिवाजी जाधव, भरत पवार, माजी उपसरपंच तुकाराम नवले युवा कार्यकर्ते गणेश शिंदे माजी सदस्य विकास शिंदे आणि वाळजवाडी गावचे सरपंच उमेश पाडळे बाबुराव पाडळे या सर्वांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला.
0 Comments