मुरगूड मध्ये रक्तदान शिबीरास उस्पूर्द प्रतिसाद.
मुरगूड मध्ये रक्तदान शिबीरास उस्पूर्द प्रतिसाद.
------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मुरगूड/ प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
------------------------------
शहरातील नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी श्री.गणेश जयंती व २८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . शहर आणि पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी मोठ्या संखेने शिबीरात उत्स्फूर्दपणे सहभाग घेऊन रक्तदान केले . सकाळी १० वाजता सुरु झालेले रक्तदान शिबिर संपूर्ण दिवसभर चालू होते .
यावेळी अमित सुतार , ओंकार दरेकर , अनिकेत गवाणकर , संदिप कलकुटकी , रोहित भारमल, अक्षय दरेकर , प्रभात भोई , अक्षय चव्हाण , गौरव साळोखे या तरुण उद्योजकांसह अनेक रक्तदात्यानीं उस्पूर्दपणे रक्तदान केले .
वैभवीलक्ष्मी ब्लड सेंटर , राजाराम रोड , कोल्हापूर यानीं ब्लडचे संकलन केले .
Comments
Post a Comment