मराठा बाधवांसाठी " पुढचं पाऊल"दिशा दर्शक ठरेल दतात्रय पाटील.

 मराठा बाधवांसाठी " पुढचं पाऊल"दिशा दर्शक ठरेल दतात्रय पाटील.

 -----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

भणंग प्रतिनिधी 

 शेखर जाधव 

-----------------------------------

-- अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे प्रसिद् होणार पुढचं पाऊल पुस्तक मराठा बांधवांसाठी दिशा दर्शक ठरणार असलेची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी पुस्तकाचे कव्हर पेजचे प्रकाशन प्रसंगी काढले ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यावसायिकतेचा ध्यास या अनुषंगाने “आजचा निश्चय, पुढचं पाऊल" ही ७४ पानी पुस्तिका प्रसिध्द होणार आहे. सदर पुस्तिकेचे कव्हर पेजचे प्रकाशन पाचवड येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्यालयात प्रकाशन करण्यात आले.

              मराठा समाजाला आज ज्ञानसंपत्ती, गुणात्मकतेची व्यावसायिकतेची मोठी गरज आहे. त्यासाठीची ही जनजागृती मोहीम आहे. या पुस्तिकेमध्ये ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानातील स्वीकारार्ह बदल, आरक्षण, विवाह सोहळे, कुटुंबसंस्था, जमिनीचे रेकार्ड कसे ठेवाल, प्रगत शेती, विधिसाक्षरता, अर्थसाक्षरता, नको नुसत्याच MPSC च्या वाटा, स्मार्ट फोन सोशल मिडियाचा वापर, विविध प्रकारचे शासकीय दाखले, केंद्र व राज्य सरकारच्या व विविध महामंडळांच्या कर्ज योजना, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या शासकीय आणि खाजगी १२५ शिष्यवृत्तींची माहिती, प्रक्रिया उद्योग, वसतिगृह, निर्वाह भत्ता, अशी उपयुक्त माहिती या पुस्तिकेत प्रसिध्द करण्यात येणार आहे. सदर पुस्तीकेची संकल्पना अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांची आहे.

         या पुस्तिकेच्या माध्यमातून राज्यभरात महासंघाचे कार्यकर्ते प्रत्यक्ष कुटुंबाना भेट देऊन वितरीत करणार आहेत. त्यामुळे सुमारे ३ लाख व्यक्तींच्या पर्यंत समाज संघटन व सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक जागृतीसाठी हा उपक्रम असून आपल्या जिल्ह्यामध्ये महासंघाचे सर्व पदाधिकारी सभासद हे जनजागृतीसाठी घरोघर संपर्क साधणार आहेत. या पुस्तिकेच्या माध्यमातून QR Code च्या द्वारे नामवंत व्यक्तींच्या समाजाला संदेश तसेच विविध प्रकारची माहिती महासंघातर्फे मराठा बांधवांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्तीय सल्लागार डॉ. गिरीष जाखोटिया, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, माजी कुलगुरु पुणे विद्यापीठ डॉ. अरुण अडसुळ, ज्येष्ठ विधिज्ञ मा. उज्वल निकम, ज्येष्ठ कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन संस्था मा. बाबा भांड, अध्यक्ष बीव्हीजी ग्रुप पुणे मा. हनुमंतराव गायकवाड, अध्यक्ष सह्याद्री फार्म नाशिक मा. विलास शिंदे, चेअरमन मगरपट्टा सिटी पुणे मा. सतीष मगर, अध्यक्ष ग्लोबल कोकण स्वराज्य भूमी अभियान मा. संजय यादवराव, इतिहास संशोधक मा. इंद्रजीत सावंत, संवाद कौशल्य, वकृत्व कला प्रशिक्षक मा. शशांक मोहिते इ. मान्यवरांचे संदेश या पुस्तिकेच्या मुखपृष्ठावरुन दिले आहेत .

     आजचा निश्चय, पुढचं पाऊल या पुस्तीकेच्या कव्हर पेजचे उद्दघाटन प्रसंगी सातारा जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांचे हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी सातारा जिल्हा सरचिटणीस जितेंद्र भोसले , जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी ,युवक जिल्हा अध्यक्ष जितेंद्र गायकवाड , न्युज मराठी लाईव्ह चे संपादक श्री अनिल करंदकर सातारा जिल्हा सोशल मिडिया प्रमुख तसेच जावली तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर करंदकर , जावली तालुका महिला अध्यक्षा सौ शिल्पा गोळे , वाई तालूका युवक कार्यअध्यक्ष राजेंद्र इथापे .प्रिंट मिडिया जावली तालुका अध्यक्ष सुनिल धनावडे. जावली तालुका सोशल मिडीया अध्यक्ष संजय वांगडे , मेढा केळघर विभाग प्रमुख चंद्रशेखर जाधव ,वाई तालुका सरचिटणीस प्रशांत भोसले. तरुण भारत पत्रकार संजय भाडळकर , जावली तालुका कार्याध्यक्ष कुडाळ विभाग विलास दरेकर , कार्याध्यक्ष बजरंग वांगडे. फ्रंट लाईन न्युज अमर इंदलकर. आणि त्याच प्रमाणे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.