Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

दहा दिवसीय श्रामणेर शिबीराचा समारोप.

 दहा दिवसीय श्रामणेर शिबीराचा समारोप.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 रिसोड प्रतिनिधी

रणजीत ठाकूर

------------------------------

.भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा रिसोड च्या राष्ट्रीय चित्रपटकार्याध्यक्ष आद.भिमराव यशवंतराव आंबेडकर यांमाणच्या आदेशाने दिनांक ९फेब्रु.पासुन दहा दिवसीय श्रामणेर प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. दिनांक १८फेब्रु रोजी शिबिराचा समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शालिग्राम पठाडे, प्रमुख मार्गदर्शक जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ भगत होते. प्रथम संघनायक पु.भ.महेंद्रबोधी के.शि.रमेश सुरवाडे सर्व मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भन्तेंजीनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले.

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव हिवाळे कोषाध्यक्ष यांनी केले. शिबीर सुरु करण्यासाठी आलेल्या समस्या,सगळ्यांचे सहकार्य याविषयी माहिती दिली. उपस्थित नव दिक्षित श्रामणेर यांनीही मनोगत व्यक्त करताना पुढे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सुरू असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीला गतिमान करण्यासाठी सहभाग घेऊ.

 शीलाचे आचरण करु

 भन्ते महानाम(राहुल जुमडे) यांनी जे आतापर्यंत विचाराचे काटेरी कुंपण होते ते नष्ट झाले.

पट्टिसेन( अभिमन्यू पंडित) शीलाचे आचरण करेन, प्रज्ञानंद(राहुल नरवाडे)महागांव यवतमाळ यांनी शिबीरात सहभागी झाल्या बद्दल नियोजनबाबत प्रशंसा केली.

धम्म रत्न (माधव गायकवाड) गावी गेल्यावर धम्म चळवळीत सहभाग घेईन

 कश्यप (ॠषिकेश वाठोरे)

प्रमिलाताई शेवाळे यांनी सुद्धा भारतीय बौद्ध महासभा व बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहाशीच समाजाने एकनिष्ठ राहावे असे सांगितले. हरिश्चंद्र पोफळे यांनी शिबीर यशस्वी केल्याबद्दल कार्यकारिणी चे कौतुक केले.

 मार्गदर्शक सिद्धार्थ भगत यांनी समाजाला आवाहन केले . सगळ्यांच क्षेत्रात मनुवाद फोफावत आहे. तो रोखण्यासाठी समाजाने एक संघ पणे आंबेडकर घराण्याच्या पाठी मागे राहावे, कार्यक्रमाला उपस्थित प्रा.मुकुंद वानखेडे, नागोराव उचित, रणवीर साहेब, पी.के.भगत, नंदाताई भगत छगण सरकटे , जिल्हा मेजर अश्विन खिल्लारे, देवानंद वाकोडे, लांजेवार, दत्ता लाटे,प्रा.रवि अंभोरे,प्रा.नंदकिशोर खैरै, प्रा.रंगनाथ धांडे, भीमराव खरात,प्रा.बी.डी.भगत, अर्जुन कांबळे, केशव संभादिंडे, नितेश नवघरे, समाधान वानखेडे, 

  दहा दिवस श्रामणेर संघास निवास व्यवस्था केल्या बद्दल भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मिगारमाता विशाखा संबोधुन त्यांच्या कुटुंबाचा सत्कार केला.

 दहा दिवस पीण्याचे पाणी दान देणारे रमेश कळासरे यांचाही सन्मान केला. भारतीय बौद्ध महासभेला सढळ हस्ते दान देणारे सुरेश मोरे सर,

 दहा दिवस श्रामणेर संघास भोजन दान कल्पनाताई श्रावण जमधाडे, सुशिलाताई आत्माराम पंडित, लक्ष्मी भास्कर इंगळे, भामाबाई सुरळकर, मीनाताई भास्कर पंडित, प्रमिलाताई शेवाळे, आशा गुलाब मस्के, कांताबाई भिमराव मोरे, सुनिताताई रतन बाविस्कर, यांनी दिले

तर नाष्टा , फळाहार मेघाताई पर्विण बोर्डे, मालतीबाई जावळे, गुंफा बाई इंगोले, सिंधुताई वानखेडे, ज्योत्स्नाताई कपिल वाठोरे, जिजाबाई कैलास कळासरे, महानंदा वाठोरे, मीनाताई चव्हाण, 

शिबीर यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी संध्याताई पंडित, मंदाताई वाघमारे, प्रमिलाताई शेवाळे, महानंदाताई वाठोरे, मीनाताई चव्हाण, सिंधुताई वानखेडे, सुजाताताई खरात, गुंफाबाई इंगोले, मालतीबाई जावळे, भिवाजी खंडारे, रामजी बानकर यांनी सकाळी तीन वाजता च संघाला आंघोळीसाठी गरम पाणी दिले.

   माधव हिवाळे, देविदास सोनुने, गणेश कवडे,संजय मैदकर, कैलास सुर्वे, कपिल वाठोरे, कैलास कळासरे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास सुर्वे तर आभार रामजी बानकर यांनी मानले. आशिर्वाद, सरणतयं घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.

Post a Comment

0 Comments