अखेर वाकद येथिल शादीखान्याचे काम सुरु?

 अखेर वाकद येथिल शादीखान्याचे काम सुरु?

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

रणजीत ठाकूर

--------------------------------

वंचितच्या आंदोलनाचा प्रशासनाने घेतला धसका.

तालुक्यातील वाकद येथिल अल्पसंख्याक समाजासाठी अल्पसंख्यांक निधीतून शादीखाना मंजूर करण्यात आला. शादीखाना मंजूर होऊन त्यासाठी निविदा बोलावून अवश्य प्रक्रिया सुद्धा सहा महिन्यापूर्वी पूर्ण करण्यात आली होती परंतु ज्या ठेकेदाराला काम देण्यात आले त्याने अद्यापपर्यंत काम सुरूच केले नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सय्यद अकील यांनी प्रशासनाला 27 फेब्रुवारी मंगळवारला निवेदन देऊन काम का सुरु झाले नाही व कधी होणार याची विचारणा केली होती. त्यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्याला अनेकवेळा विचारपूस केली असता केवळ टोलवाटोलवीची उत्तरे देऊन वेळकाढू धोरण अवलंबिल्यामुळे सय्यद अकील यांच्या नेतृत्वात 27 फेब्रुवारी ला उपाभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग रिसोड यांना प्रा. रंगनाथ धांडे,मोहम्मद असिफ, सदानंद गायकवाड,सुनील इंगळे केनवड,श्रीकांत वाकुडे, हाजी सय्यद रमजान, सय्यद नाजीम, मौसीन खान दौलतखान,लुकमान खान रशीद खान,सिद्धार्थ जमधाडे,शेख वसिम, अक्षय सपकाळ इत्यादी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांच्या समवेत निवेदन देऊन पाच मार्चला वाकद येथे रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. प्रशासनाने वंचितच्या आंदोलनाचा धसका घेत 29 फेब्रुवारी ला अभियंता गणेश चाटे व ठेकेदार रोहित दांदडे यांनी स्वतः उपस्थित राहून शादीखाण्याचे काम मार्किंग करून सुरु केले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सय्यद अकील यांनी तूर्तास रास्ता रोको आंदोलन मागे घेत शादीखाण्याचे काम सलग व दर्जेदार करण्याची सूचना केली आहे.कामात खंड पडल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा सज्जड दम दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.