Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामदैवत पाडळेश्वराची यात्रा जावळीत प्रथमच श्वान शर्यत स्पर्धा.

ग्रामदैवत पाडळेश्वराची यात्रा जावळीत प्रथमच श्वान शर्यत स्पर्धा.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

मेढा प्रतिनिधी

प्रमोद पंडीत 

-------------------------------------

सातारा पासून अवध्या १८ किमी अंतरावर सह्याद्रिच्या कुशीत वसलेले आणि निर्सग सौन्दर्या बरोबर ऐतिहासिक वारसा लाभलेले असे ठिकाण सातारा - मेढा - महाबळेश्वर रोडवर कण्हेर धरणाच्या ८ किमी अंतरावर भारताचा नैसर्गिक नकाशाचे प्रतिभिंम लाभलेले गाव - भणंग

निसर्ग सौन्दर्या बरोबर ऐतिहासिक वारसा असलेले ठिकाण मेरूलिंगचा महादेवाचा धाकटा भाऊ "श्रीपाडळेश्वर " म्हणून पंचक्रोशित भक्तांचा नवसाला पावणारा देव भक्तांचा संकटात धाऊन येणारा देव " श्री पाडळेश्वर "

भणंग गावचे ग्रामदैवत " श्री पाडळेश्वर

ग्रामदैवत श्री पाडळेश्वराची यात्रा माद्य कृ . ५ गुरुवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ ते माघ कृ ६ शुक्रवार दिनांक ०१ मार्च २०२४ रोजी भरत आहे .

यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार दिनांक २९ /02/20 २४ रोजी जागर व रात्री छबीना आणि श्री पाडळेश्वराची पालखीतून भव्य दिव्य अशी ढोल लेझीमच्या गजरात चालणारी मिरवणूक व लोक नाटय तमाशा असतो त्या अगोदर ' त्यात कापूर ज्वलनासाठी भक्तांचा महासागर लोढला जातो असा डोळ्याचा पारणे फेडण्यासारखे दृश्य .

लाखो रुपयाचा कापुराची ज्वलन करून भक्त देवास प्रसन्न करतात . मनभावी सेवा व प्रार्थना करतात .

भक्तांच्या हाकेला धावून येणारा देव म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे . या यात्रेस भणंग पंचक्रोशितून भक्त व बाहेर गावाहून ही भक्त जन आणि ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित असतात . शुक्रवार ०१ /03/ २० २४ रोजी यात्रेचा शेवटचा दिवस सकाळी नवस फेडण्यासाठी घरापासून मंदिरा पर्यंत सर्व भक्ता नवस बोलणारे दंडस्थान करून आपला नवस फेडतात . त्या 

यात्रेला शोभा येती तो तो सर्वाचा लहानापासून थोरा पर्यंत सर्व लोकांचा आवडता कार्यक्रम लोक नाट्य तमाशा .

महाराष्ट्रात तमाशा शिवाय यात्रेला शोभाच येत नाही महाराष्ट्र हा लोक कलेला जागवणारा महाराष्ट्र राज्य आहे .

जंगी कुस्त्यांचे फड भरविले जातात कुस्ती शोकीन पैलवान सातारा , कराड , कोल्हापूर , महाबळेश्वर , व जावळीतील पैलवान व कुस्तीचे शैकिन लोक भणंगच्या यात्रेत सामील होतात . यात्रेत विविध प्रकारची दुकाने ' खेळणी विकणारे , घोडागाडीवाले , आईस्क्रिम वाले विविध व्यवसायिक दुकाने माडतात व यात्रेची शोभा वाढवतात .

दिनांक २ मार्च २०२४ ला जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा भणंग या शाळेतील मुलांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहे .

जावळीत प्रथमच श्वान शर्यत घेण्यात आल्या आहेत . श्वान शर्यत मैदान जावली केसरी भरविण्यात येत आहे . तरी श्वान शर्यत मैदानावर जास्ती जास्त श्वान मालकांनी उपस्थित राहुन मैदानाची शोभा वाढवावी असे आयोजक हनुमान उदय मंडळ भणंग व ग्रामस्था यांनी विनंती केली

या यात्रेचा सर्व जावली करानी लाभ घ्यावी असे आवाहन भणंगचे सरपंच श्री गणेश जगताप व हनुमान उदय मंडळाचे अध्यक्ष श्री जोतीराम जाधव यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments