शिवचरित्राचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास साधावा. डॉ. दिपक जाधव.
शिवचरित्राचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास साधावा. डॉ. दिपक जाधव.
----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
---------------------------
छत्रपती शिवाजी महाराजाचे चरित्र निरंतर दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे आहे. त्याच्या कार्यातून, योगदानातून बोध घेऊन आपला व्यक्तिमत्व विकास साधावा असे प्रतिपादन डॉ. दिपक जाधव यांनी केले. ‘शिवजयंतीनिमित्त किसन वीर महाविद्यालयातील इतिहास विभाग, आयक्यूएसी व शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ.दिपक जाधव पुढे म्हणाले की, आज शिवचरित्र केवळ इतिहास या विषयापुरते आपण सीमित करून ठेवले आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र विद्यार्थी फारसे वाचत नाहीत. शिवचरित्रातील विविध पैलूंवर नव्याने आकलन, संशोधन होणे गरजेचे आहे. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते, सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्ष भावनेने राज्यकारभार करणारे राजे होते. व्यक्तीपेक्षा गुणीजनांचा प्रशासनात समावेश, व्यवस्थापकीय कौशल्य, किल्ला, न्याय प्रशासन, कमीतकमी साधनसंपत्तीचे सुयोग्य वापर, जलव्यवस्थापन, प्रबळ आरमाराची उभारणी, त्यांच्या आदर्श स्त्रीविषयक धोरण, अंतर्गत सुरक्षा, कायद्याचे राज्य हे त्यांच्या लोकाभिमुख, कल्याणकारी राज्य ही त्यांच्या प्रशासकीय राजनीतीची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये होती. शिवाजी महाराजांचे आदर्श प्रशासकीय दूरदृष्टी, व्यवस्थापकीय कौशल्ये, आपण सर्वांनी आत्मसात करून व्यक्तिमत्वाचा विकास साधावा, असेही त्यांनी आवाहन केले.
डॉ. भिमाशंकर बिराजदार, इतिहाविभागप्रमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. (डॉ.) सुनिल सावंत प्रभारी प्राचार्य यांनी अध्यक्षीय समारोप केला. संध्या मांढरे हिने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राची जगताप हिने सूत्रसंचालन केले तर वैष्णवी मांढरे हिने शेवटी सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास बहुसंख्य प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment