Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

तासवडे एमआयडीसी मध्ये घडलेले चोरीचे २ गुन्हे २४ तासाच्या आत उघडकीस.

 तासवडे एमआयडीसी मध्ये घडलेले चोरीचे २  गुन्हे २४ तासाच्या आत उघडकीस.

------------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कराड प्रतिनिधी 

वैभव शिंदे

------------------------------------------------

तळबीड पोलीस ठाणे हद्दीत तासवडे एम.आय.डी.सी.मध्ये दि.०७/०२/२०२४ व दि १०/०२/२०२४ रोजी दोन ठिकाणी चो-या झाल्या होत्या. मा. पोलीस अधीक्षक सातारा, मा अप्पर पोलीस अधिक्षक, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड यांनी तळबीड पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी के. आर. भोसले यांना त्याचे पोलीस ठाणेचे कर्मचाऱ्यास सह तपास करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सी.सी.टी.व्ही फुटेच च्या आधारे तांत्रिक तपास करून काल दि.१३/०२/२०२४ रोजी एम.आय.डी.सी मध्ये पेट्रालिंग करीत असताना सी.सी.टी.व्ही फुटेच चे आधारे गोपणीय बातमीव्दारा मार्फत चोरटयाची नावे निष्पन्न केली. काल रोजी एम.आय.डी.सी परिसरात स.पो.नि भोसले व सोबत पो.हवा ओंबासे, पो.ना भोसले, दिक्षीत पो कॉ विभूते, पो कॉ कुंभार, पो कों फडतरे, पो कॉ राठोड, पो कॉ गायकवाड असे शासकीय वाहनातून पेट्रालिंग करीत असताना नंबर प्लेट नसलेल्या मोटार सायकल वरून ३ संशयीत कराड मोटर्स कंपनीचे पूर्व बाजूस जात असताना दिसून आले त्याना थांबवून चौकशी केली असता ते त्याचे जवळ असलल्या पोत्याबाबत काहीही माहिती देत नव्हते. म्हणून त्याना ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली असताना त्यांनी श्रेयश इंडस्ट्रीज येथे व सुएय फार्मुलेशन या दोन कंपनीत चोरी केली असल्याची कबुली दिली. त्याचे ताब्यातून दोन गुन्हयात चोरीस गेलेला तांब्याच्या क्लोजींग प्लेटा स्टेनलेस स्टील बॅकेट पट्टया जिओ कंपनीचा राऊटर असा एकूण ४६,५००/- रूपयेचा माल व स्प्लेंडर हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे. सदर बाबत विधीसंघर्ष बालक याचेकडे चौकशी करून त्याचेकडून वरील माल रिकव्हर करून वरील दोन्ही गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदर विधीसंघर्ष बालकाचे नातेवाईकांना बोलावून घेवून त्याचे समक्ष विधीसघर्ष बालकांचे समुपदेशन केले आहे.


  सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक मा. आंचल दलाल मॅडम मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि भोसले व पो.हवा ओंबासे, पो.ना भोसले, दिक्षीत पो कॉ विभूते, पो कों कुंभार, पो कॉ फडतरे, पो कॉ राठोड, पो कॉ गायकवाड यांनी वरील दोन्ही घरफोडीचे गुन्हे २४ तासात उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी केली म्हणून पोलीस अधिक्षक सातारा यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments