भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको.
---------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
---------------------------
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दि. 20 रोज मंगळवार ला आमरण उपोषण सुरू झाले असून आज अमरण उपोषण चैथ्या दिवसात पोचले आहे. बहुप्रतीक्षित नदीजोड प्रकल्पातून वाशिम जिल्हा वगळण्यात आला. गेल्या आनेक वर्षापासून प्रतीक्षा आसणार्या नदीजोड प्रकल्पाचा आराखडा समोर आला त्यामध्ये वाशिम जिल्हयाचा कुठेही समावेश नाही. शासनाने वाशिम जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधीं आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्यामुळे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर व जिल्हाअध्यक्ष रामेश्वर आवचार हे आमरण उपोषणास बसले आहेत. शेतकऱ्यांना प्रचंड त्रास देणार्या रोही, हरीण, वानर, रानडुक्कर याच्यां बंदोबस्तासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा. सोयाबीनची नाफेड द्वारा खरेदी करण्यात यावी. अग्रीम पीकविमाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा. शेतकऱ्यांना कृषी पंपाला मोफत व मुबलक वीज मिळावी. ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबाला मिळणार्या घरकुल अनुदानात दुप्पट वाढ करावी व जागेचा प्रश्न मार्गी लावावा या साठी अमरण उपोषणाचे हत्यार भूमिपुत्र कडुन उपसण्यात आले आहे.संबंधित विभागाने आमरण उपोषणाची दखल न घेतल्यामुळे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने 26 फेब्रुवारी सोमवार 2024 ला जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, जिल्हाधिकारी वाशिम व जिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम यांना देण्यात आले आहे. निवेदनावर युवक राज्य उपाध्यक्ष केशव गरकळ, युवक जिल्हाध्यक्ष सचिन काकडे, वाशिम तालुका अध्यक्ष संतोष सुर्वे ,कारंजा तालुकाध्यक्ष देवेंद्र् लांडकर, रिसोड शहराध्यक्ष विकास झुंगरे ,मंगरूळपीर तालुका अध्यक्ष विलास गव्हुले, सेनगाव तालुका अध्यक्ष संतोष खोडके ,संजय सदर, जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी बोरकर , जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र चोपडे, अमर दहीहंडे ,भूषण मुराळे, विनोद घुगे ,जालिंदर देवकर, श्रीरंग नागरे ,वैजनाथ रंजवे, महिला समन्वयक डॉ. तृप्ती गवळी ,महिला जिल्हाध्यक्ष संगीताताई मार्गे ,दत्तराव इंगोले वसंतराव दुबे, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments