Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जवळवाडीच्या सुपुत्राची कौशल्य कलेत बाजी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हाधिकारी दुडी यांच्या हस्ते सत्कार संपन्न.

 जवळवाडीच्या सुपुत्राची कौशल्य कलेत बाजी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हाधिकारी दुडी यांच्या हस्ते सत्कार संपन्न.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मेढा प्रतिनिधी

शेखर जाधव 

-------------------------------

  जावली तालुक्यातील मौजे जवळवाडीच्या अविष्कार सुधीर धनावडे याने  कौशल्य कलेत बाजी मारून आपल्या गावाचे,सहकाऱ्यांचे नाव उंचावले असून त्याच्या या कामगिरीने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

        जवळवाडी गावचे रहिवासी साहेबराव लक्ष्मण धनावडे आणि बाजीराव लक्ष्मण धनावडे यांचा नातू अविष्कार सुधीर धनावडे याने महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी  ( mslns) कौशल्य ,रोजगार उद्योजकता आणि नवोपक्रम विभाग ,महाराष्ट्र सरकार द्वारे आयोजित स्टूडंट इनोव्हेशन चॅलेज 2023चे जिल्हास्तरीय विजेते म्हणून त्याचा गौरव भारतीय प्रजासत्ताक दिनी शाहू स्टेडियम सातारा येथे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई सो आणि जिल्हाधिकारी दुडी साहेब यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

 अविष्कार हा सध्या वाई येथील आय टी आय  या संस्थेमध्ये दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याने पाठविलेला प्रोजेक्ट मंजुर झाला असून पहिल्या १० कमांकामध्ये नंबर आलेबद्दल त्याला १ लाख रुपयाचा धनादेश व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.          अविष्कार याला इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातले मार्गदर्शक शिक्षक नितिन वाघमारे आणि शरद जगदाळे ( किंग इलेक्ट्रॉनिक्स वाई ) यांचे मोलाचे सहकार्प लाभले.

या यशाबद्दल जवळवाडी गावच्या सरपंच सुरेखा मर्ढेकर, माजी सरपंच माधुरी धनावडे,सदाशिवराव जवळ, वर्षा जवळ,उपसरपंच शंकर जवळ,विलास बाबा जवळ,सुरेश बुवा जवळ,मेढा नगरीचे माजी सरपंच नारायणराव शिंगटे,आनंदराव जवळ,सचिन जवळ तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,भैरवनाथ तरुण मंडळ जवळवाडी चे सर्व पदाधिकारी, सदस्य,आणि ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments