सातारा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. लोकांची नजर चुकवून दिवसा घरातून चोरी करणारा चोरटा गजाआड.. आरोपीकडून ३ मोबाईल, १ लॅपटॉप, मोटारसायकल असा एकूण १,३५,०००/- रुपयेचा ऐवज हस्तगत.
--‐-----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
--‐-----------------------------
सातारा शहरातील गोडोली येथील रहाते घरातून व एम.आय.डी.सी सातारा येथील एका ट्रेनिंग सेंटरचे ऑफिसमधून अशा दोन ठिकाणाहून एका चोरट्याने दिवसाचे वेळी तेथील लोकांची नजर चुकवून मोबाईल व लॅपटॉपची चोरी केली होती. सदर चोरीबाबत सातारा शहर पोलीस ठाणेस दोन चोरीचे गुन्हे नोंद करण्यात आलेले होते.
मा. पोलीस अधिक्षक श्री समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल, मा.उप. वि. पोलीस अधिकारी श्री किरणकुमार सुर्यवंशी, मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र म्हस्के यांचे मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस स्टेशन डी.बी. पथकाचे अधिकारी व पोलीस स्टाफने तांत्रिक माहितीचे व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त केली की, सदरचा चोरटा दत्तात्रय उर्फ योगेश नंदकुमार खवळे वय 23 वर्षे रा. बौद्ध वस्ती कोडोली ता. जि. सातारा हद्दीमध्ये राहण्यास असून तो चोरीचे गुन्हे करीत असतो. त्याअनुशंगाने त्याचा सदर भागात सलग तीन दिवस डी.बी. पथकाने ठिकठिकाणी चौकशी करून त्याचे येण्याजाण्याचे ठिकाणाबाबत उपयुक्त माहिती प्राप्त केली. काल रोजी रात्रीचे वेळी तो दत्तनगर कॅनॉल परिसरामध्ये आला असल्याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्याने डी.बी. पथकाने तात्काळ जावून त्यास ताब्यात घेत असताना तो त्याचेजवळील मोटारसायकलवरून पळून जात असताना त्यास मोटारसायकलवरून पाठलाग करून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास सदर गुन्हयाबाबत विश्वासात घेवून त्याचेकडे कौशल्यपूर्वक चौकशी केली असता त्याने सदरचे गुन्हे केलेची कबुली दिली. सदर आरोपीकडून चोरीचे ३ मोबाईल व १ लॅपटॉप व १ पल्सर Ns 125 स्पोर्ट बाईक असा एकूण १,३५,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला असून सातारा शहर पोलीस ठाणचे एकूण दोन गुन्हे उघडकिस आलेले आहेत. सदर आरोपीने इतर ठिकाणी देखील चोरी केलेले चौकशीत समजून येत असून त्याबाबत अधिक तपास सुरु आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल, मा.उप.वि. पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र म्हस्के यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, पो. हवा. सुजित भोसले, निलेश जाधव, पो.ना. पंकज मोहिते, विक्रम माने, पो.कॉ. इरफान मुलाणी, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, सुशांत कदम यांनी केलेली आहे.
0 Comments