रिसोड येथे श्री संत नरहरी महाराज यांची पुण्यतीथी उत्साहात साजरी.

 रिसोड येथे श्री संत नरहरी महाराज यांची पुण्यतीथी उत्साहात साजरी.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनीधी

रणजीत ठाकूर

------------------------------------

 येथील सोनारा समाजाच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतीथी कार्यक्रमाचे आयोजन संत सातारकर महाराज संस्थान मध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अरुणराव काटोले होते तर प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. कृष्णाआप्पा आसनकर, गणेश सेठ बगडीया, रामभाऊदादा काटोले, कमलाकर टेमधरे, विष्णुपंत चाकोतकर, राजुभाऊ साखरकर, रामकृष्ण काटोले, शंकरभाऊ वर्मा, अरुणभाऊ शहाने, प्रल्हा सावळकर, माजी नगराध्यक्ष यशवंतराव देशमुख, महादेवराव बुट्टे, गजानन बानोरे, मधुकर चाकोतकर उपस्थित होते. 

 सर्वप्रथम व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते श्री संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन महाआरती करुन प्रसादाचे वाटप करण्यात आले. व्यासपिठावरील मान्यवरांचा आयोजकाच्या वतीने पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलतांना माजी प्राचार्य कमलाकर टेमधरे म्हणाले की, शहरातील सर्व शाखेच्या सोनार समाजाने एकत्र येऊन आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतीथी कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल सर्व प्रथम मी आयोजकाचे कोतुक करतो तसेच आयोजन समितीच्या वतीने लवकरच रिसोड शहरात शासकिय जागा घेऊन श्री संत नरहरी महाराजाचे मोठे मंदिर बांधण्याचा निश्चय करण्यात आला. त्याच प्रमाणे त्यासाठी समाजातील अनेक दानशुर व्यक्तींनी या ठिकाणी मंदिर बांधकामासाठी सढळ हस्ते मदत केली आहे. शहरातील अनेक समाजबांधव मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी देण्यास तयार आहेत. त्यामुळे भविष्यात निश्चीतच रिसोड शहरात श्री नरहरी महाराज यांचे भव्य असे मंदिर उभारलेले दिसेल. तसेच या प्रसंगी गजानन बानोरे, माजी नगराध्यक्ष यशवंत देशमुख, अ‍ॅड. कृष्णाआप्पा आसनकर इत्यादिंची समायोचित भाषणे संपन्न झाली.

 हा कार्यक्रम यशस्वि करण्यासाठी रमेश चाकोतकर, गणेश चाकोतकर, धनंजय चाकोतकर, दिपक चाकोतकर, संतोष चाकोतकर, अरुण शहाने, रवि चाकोतकर, विठ्ठल डिंडरकर, गजु शहाने, रमेश हांडेकर, आनंद बुट्टे, निलेश बुट्टे, संतोष बानोरे, योगेश खके, सुशिल टेहरे, राजुभाऊ साखरकर, गोलु डिंडरकर, दिनकर गोटे, हर्षल काटोले, ओम साखरकर, नागेश साखरकर, रविंद्र म्हाळणकर, किशोरभाऊ नगरकर, अमोल मुगवानकर, राहुल केसकर, नागेश सखारकर, नंदुभाऊ साखरकर इत्यादिंनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचलन व आभार शिक्षक सारोळकर यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.