किसन वीर महाविद्यालयात राज्यस्तरीय तंत्रज्ञान स्पर्धेचे आयोजन.

 किसन वीर महाविद्यालयात राज्यस्तरीय तंत्रज्ञान स्पर्धेचे आयोजन.

 -------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 वाई प्रतिनिधी

 कमलेश ढेकाणे  

 -------------------------

वाई: येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात बी.सी.ए. विभागामार्फत दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता “ राज्यस्तरीय तंत्रज्ञान TECH-FEST 2K24” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे उदघाटन सातारा येथील फ्रेनजन उद्योगाचे मॅनेजिंग पार्टनर पंकज सारडा यांच्या शुभहस्ते होणार असून जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, सचिव डॉ जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, बी.सी.ए. चे समन्वयक डॉ. सुनील सावंत, विभागप्रमुख सौ. अर्चना कदम व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

या स्पर्धेच्या समारोपावेळी डॉ. सुरभीताई भोसले (चव्हाण) प्रमुख पाहुण्या आहेत. या राज्यस्तरीय तंत्रज्ञान स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, तसेच सोलापूर, पुणे अशा अन्य जिल्ह्यांतून विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या तांत्रिक कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी, अभ्यासपूर्ण चर्चा करण्यासाठी आणि उद्योग व्यावसायिकांसोबत नेटवर्क उपलब्ध करून देण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे हा उद्देश आहे.  

या तंत्रज्ञान स्पर्धेमध्ये सी, सी प्लस प्लस (C/C++ Programming), पोस्टर प्रेझेंटेशन, पी.पी.टी. प्रेझेंटेशन, गेमिंग, टेक्नो रांगोळी, टेक्नो क्विज व वेब डिझाइनिंग इत्यादी प्रकारच्या विविध स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक उपक्रमाच्या पहिल्या तीन विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, शिल्ड आणि प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत, अशी माहिती या तंत्रज्ञान स्पर्धेच्या संयोजिका कोमल बाबर यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.