Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोह्यातील गाडगे महाराज प्राथमिक शाळेत रंगले चिमुकल्यांचे स्नेह संमेलन.

 लोह्यातील गाडगे महाराज प्राथमिक शाळेत रंगले चिमुकल्यांचे स्नेह संमेलन.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा तालुका प्रतिनिधी 

अंबादास पवार  

--------------------------------------

  शहरातील श्री. संत गाडगे महाराज प्राथमिक शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेह संमेलन दि. २७ रोजी मंगळवारी पार पडले. चिमुकल्यांच्या विविध कलागुण दर्शनाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले.

             संत गाडगे महाराज प्राथमिक शाळेतील बालवाड़ी पासून इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मंगळवारी दि. २७ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शाळेतील चिमुरड्या विद्यार्थ्यांनी निव्वळ अभ्यासात गुंतून न रहाता खेळ, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आदी मध्ये सहभागी व्हावे. त्यांच्यातील असलेले सुप्त कलागुण, आविष्कार यांचे सादरीकरण होवून त्यांनी मोकळा श्वास घ्यावा. या उद्दात हेतूने शाळा प्रशासनाच्या वतीने प्रतिवर्ष स्नेसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. मंगळवारी शाळेच्या प्रांगणात चिमुकल्यांनी विविध गीतावर नृत्याचे उत्कृष्ठ सादरीकरण केले. 


विद्यार्थ्यांनी विविध गीतावर ठेका धरला होता. भक्ति गीत, भाव गीत, देशभक्ती गीत, लावणी, तसेच चित्रपट गीतांवर नृत्याविष्कार सादर केला. चिमुकल्यांनी सदर केलेल्या उत्कृष्ठ सादरीकरणाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते.

          स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक एस. आर. लुंगारे यांनी केले. यशस्वीतेसाठी एम. व्ही. चव्हाण, एस. के. डांगे, आर. जी. वडजे, बि. व्ही. शिवशेट्टे, एस. एस. लुंगारे, श्रीमती के. व्ही. चव्हाण, श्रीमती एस. बी. टेकाळे, श्रीमती चिंतेवार आदींनी अथक परिश्रम घेतले. सदरील सोहळ्यास शिक्षक, विद्यार्थी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments