Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पाण्याच्या टँकरला क्रुझर गाडीची पाठीमागून धडक : चार जण जखमी.

 पाण्याच्या टँकरला क्रुझर गाडीची पाठीमागून धडक : चार जण जखमी.

--------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

 शशिकांत कुंभार

--------------------------

गांधीनगर:- सरनोबतवाडी येथील पसारीचा नगर सर्विस रस्त्यावर थांबलेल्या पाण्याच्या टँकरला पाठीमागून टोयोटा अर्बन क्रुझर या चार चाकी वाहनाने धडक दिल्याने चार जण जखमी झाले. शामराव मसुद चव्हाण वय 42रा. नवे चावरे ता .हातकणंगले, सुशांत सुभाष साईल, (वय.25,) सुवर्णा सुभाष साईल, (दोघे राहणार मुंबई) जमीर मनुर शेख (रा. औरंगाबाद) अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात शुक्रवारी दुपारी अडीच सुमारास घडला. या अपघाताची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून सुशांत सुभाष साईल याच्यावर बेदरकपणे वाहन चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद ट्रक ड्रायव्हर शामराव मसूद चव्हाण यांनी फिर्याद दिली .

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी सरनोबतवाडी येथील पसारीचा नगर सर्विस रस्त्यावर‌ एम.एच.11एम 5540 पाण्याचा टँकर थांबला होता. तर पुण्याहून आलेल्या एम.एच.01-डी.एक्स 4465 या टोयाटो अर्बन क्रुझर कार ने पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामध्ये बसलेले सुशांत साईल, सुवर्णा साईल, जमीर शेख असे तिघेजण गंभीर जखमी झाले. तर टँकर ड्रायव्हर शामराव मसूद हा किरकोळ जखमी झाला. धडक ईतकी जोरदार होती की चार चाकी चा चक्काचूर झाला. जखमीना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास गांधीनगर पोलीस करत आहेत.


फोटो 

अपघातातील चक्काचूर झालेली टोयोटा क्रुझर चार चाकी

Post a Comment

0 Comments