Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिव्या का देता असं विचारल्यावर एका गरोदर महिलेसह पाच जणांना मारहाण.मनेरमाळ येथील प्रकार.

 शिव्या का देता असं विचारल्यावर एका गरोदर महिलेसह पाच जणांना मारहाण.मनेरमाळ येथील प्रकार.

---------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

---------------------------

उंचगाव पैकीं मनेरमाळ येथे असलेल्या ओंकार कॉलनी हसिना पापालाल नदाफ दोन मुलीसह राहतात हसिना नदाफ यांचा नातजावाई इलियास सोलापुरे आपली पत्नी नाजीया सोलापुरे यांच्या साठी औषध घेऊन आला होता तो संध्याकाळी 7 वाजता हसिना नदाफ यांच्या दारात असलेल्या कठड्यावर बसला होता त्यावेळीं घरासमोर राहणारे रवी वरुटे टुव्हिलर गाडीवरुन येत असताना कठड्यावर बसलेल्या इलियास सोलापुरे यांच्या अंगावर सांडपाणी मुद्दाम उडवलं म्हणून इलियास सोलापुरे यांच्या आजी सासू हसीना नदाफ यांनी रवी वरुटे यास सांडपाणी अंगावर का उडवलेस अशी विचारणा केली असता रवी वरुटे यांनी हसिना नदाफ यांना अश्लिल शिवीगाळ करण्यास सुरुवात केली असता कठड्यावर बसलेले नातजावाई इलियास सोलापुरे याने शिवीगाळ का केली? अशी विचारणा केली असता रवी वरुटे,दिपा वरुटे या पती पत्नी यांनी मिळून नात जावई इलियास सोलापूरे याच्या उजव्या हातावर व हसीना नदाफ यांच्या दोन मुली व गरोदर असलेल्या नातीस लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची तक्रार गुन्हा रजिस्टर नंबर 77/2024 भा द वि स.कलम.324,504,506,34 गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला 

परस्परा विरोधी तक्रार दाखल .

मनेरमाळ भांडणाच्या रवी वरुटे यांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर रवी वरुटे यांनी इलियास सोलापूर यांच्या विरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 78/2024 भा. द. वि. स. कलम 324,323,504,506,34 तक्रार दाखल केली आहे 

गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मनेरमाळ येथे मारामारी चोरी अवैध धंदे हे बिनबोभाट सुरू असल्याचे कारणांमुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत त्यास गांधीनगर पोलिसांनी अटकाव घालावा अशी मागणी मनेरमाळ येथील नागरिकांच्या मधून चर्चिली जात आहे

Post a Comment

0 Comments