पत्रकाराने अभ्यास करून पत्रकारिता करावी.ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी.
पत्रकाराने अभ्यास करून पत्रकारिता करावी.ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी.
-------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-------------------------
कोल्हापूर येथील शिवाजी उद्यमनगर येथील सामानी स्मृती हॉल मध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला पत्रकार स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला .
संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिवाजी विद्यापीठाचे एम ए मास कम्युनिकेशन विभागाचे सहायक प्राध्यापक ड़ॉ शिवाजी जाधव,ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी हे प्रमुख वक्ते उपस्थित होते. डॉ शिवाजी जाधव यांनी पत्रकारितेचे बदलते स्वरूप आणि पत्रकारांनी काळानुसार कसे बदलले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले.नंदकुमार ओतारी यांनी आजची व्यवस्था आणि पत्रकारांची अवस्था यावर आपले मनोगत व्यक्त केले असून आजच्या पत्रकाराने अभ्यास करून पत्रकारिता करावी असा सल्ला ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी यांनी केल्याने उपस्थितांची मने जिंकली.पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे यांनी संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार संघाच्या आगामी काळातील वाटचालीबाबत माहिती दिली पत्रकार बांधवां साठी ना नफा ना तोटा तत्वावर पुणे येथे सुरू झालेल्या सदनिका प्रकल्पाबाबत माहिती देऊन कोल्हापुरात असा प्रकल्प राबविणार असल्याचे त्यानी सांगितले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अनुराधा कदम यांनी केले. तर जिल्हा सचिव नवाब शेख यानी आभार मानले .
Comments
Post a Comment