Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

महिलांनी समाज घडविण्यासाठी स्वतः पासून सुरुवात करायला हवी: सीमा पाटील.उचगावात महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम.

 महिलांनी समाज घडविण्यासाठी स्वतः पासून सुरुवात करायला हवी: सीमा पाटील.उचगावात महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार

----------------------------------

 संसार करत असतांना सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आपण परमार्थ केला पाहिजे. स्वतः साठी वेळ दिला पाहिजे. मुलांच्या वर चांगले संस्कार केले  पाहिजेत. समाज घडवण्यासाठी आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. असे मत  ज.न.म.प्रवचनकार  सिमा पाटील यांनी केले.


रथसप्तमी निमित्त  उचगाव तालुका करवीर येथील सर्व बचत गटांच्या महिलांसाठी आयोजित हळदी कुंकू समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येऊन स्पर्धा आयोजित  विजेत्यां महिलांना बक्षिसे देण्यात आली. या  कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या  गौरी मुसळे ,  ज.न.म. प्रवचनकार  सिमा पाटील ,सरपंच मधुकर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अश्विनी चव्हाण , उपसरपंच  सारिका माने, ग्रामसेवक दत्ता धनगर, प्रभाग संघाच्या अध्यक्ष व  सखी मंच कमिटी सदस्या सुरेखा कदम , करवीर पंचायत समिती  प्रवर्तक जन्नत मुल्ला , बडोदा बॅंक बचत गटाच्या सिआरपी अमृता ताई व महाराष्ट्र बॅंक सिआरपी प्राजक्ता कांबळे  व लोकमत सखी मंचच्या प्रिया देसाई व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्या  आणि दीडशे  महिला उपस्थितीत होत्या.विशाखा कदम यांनी प्रास्ताविक केले. हर्षदा वाईंगडे यांनी आभार मानले.फोटो ओळ:


उचगाव येथे महिला बचत गटांसाठी आयोजित महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम प्रसंगी 


गौरी मुसळे , सिमा पाटील , अश्विनी चव्हाण , उपसरपंच  सारिका माने,  सुरेखा कदम , प्रतिभा जाधव आदी 

Post a Comment

0 Comments