Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर ( उ ) जिल्हा तर्फे दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा.

 वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर ( उ ) जिल्हा तर्फे दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

कोल्हापूर प्रतिनिधी

----------------------------------

         कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी ने जिल्हाधिकारी कार्यालय हादरून गेले.

          शेतकऱ्याच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी,, केंद्र सरकारने स्थगित केलेले, काळे कायदे रद्द्द करावेत, मार्केट यार्ड मध्ये हमी भावापेक्षा कमी भावात शेतमाल घेतल्यास, संचालक वर कायदेशीर कार्यवाही करावी, इत्यादी मागण्या करिता दिल्ली येथे देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सरकार दबाव तंत्राचा चा वापर करीत आहे त्या विरोधात वंचित. बहुजन आघाडी यांनी शेतकऱ्याच्या मागे खंबीरपणे उभे राहून, त्यांच्या हिताकारिता लढा तीव्र करण्याचे जाहीर केले व वंचित तर्फे दिल्ली येथील आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे,  

         या शिवाय हातकणंगले तालुक्यातील टोप, संभापूर, शिये,व नागज फाटा येथील पुणे बेंगलोर हायवे वर रस्ता रुंदीकरणा मध्ये जमीनदोस्त करीत असलेल्या झोपडपट्टी धारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी व मूल्यांकनानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी. शिरदवाड येथील सरपंच निवडीमध्ये एकतर्फे निकाल देणारे शिरोळ तालुक्याचे तहसीलदार यांची खाते निहाय चौकशी करून त्यांचे निलंबन करण्यात यावे. पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या सर्व घटकावर कारवाई करण्यात यावी. या सह अन्य मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.. 

     जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे मार्फत, मा पंतप्रधान यांना निवेदन सादर करण्यात आले. 

     या वेळी जिल्हा महासचिव महादेव कुंभार,दक्षिण विभागाचे जिल्हा महासचिव महादेव कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष ऍड भीमसेन कांबळे, जिल्हा सचिव रावसाहेब निर्मळे, करवीर तालुका अध्यक्ष भिमराव गोंधळी, जिल्हा कोषाध्यक्ष विकास बाचने, जिल्हा सचिव प्रताप तराळ, जिल्हा सह सचिव विश्वास फरांडे, जिल्हा संघटक तानाजी काळे, महिला आघाडी शिरोळ तालुका अध्यक्षा गीता कांबळे, करवीर तालुका अध्यक्षा मुक्ता ताई भास्कर, करवीर तालुका उपाध्यक्ष रमेश पोवार, करवीर महासचिव अर्जुन कांबळे, तरी जिल्यातील वंचित बहुजन आघाडी अंतर्गत काम करणाऱ्या सर्व सलग्न संघटना त्यांचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते. महिला आघाडी, युवक आघाडी, कामगार आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे सर्व उपस्थित होते.

   आपले नम्र

    मा.विलास कांबळे.

    जिल्हाध्यक्ष.                

वांचित बहुजन आघाडी कोल्हापूर ( उ ) जिल्हा.

Post a Comment

0 Comments