Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोहा सार्वजनिक शिवजयंती मंडळ अध्यक्षपदी पैलवान नारायण पवार तर सचिव पदी शहाजी पवार यांची निवड.

 लोहा सार्वजनिक शिवजयंती मंडळ अध्यक्षपदी पैलवान नारायण पवार तर सचिव पदी शहाजी पवार यांची निवड.

------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधि

अंबादास पवार 

------------------------

लोहा सार्वजनिक शिवजयंती मंडळ कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी पै. नारायण पवार तर सचिव पदी पत्रकार शहाजी पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

                  नांदेडचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्ष शासनाने निश्चित केलेल्या तारखेनुसार लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात येते. यावर्षी देखील शिवजन्मोत्सव सोहळा हार्ष उल्हासात साजरा करण्यासाठी दि. ३ फेब्रुवारी रोजी शनिवारी शहरातील खा. चिखलीकर संपर्क कार्यालयात युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंती मंडळ कार्यकारिणी निवड करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. याप्रसंगी शिवजयंती उत्सव मंडळ पुढीलप्रमाणे अध्यक्ष- पै.नारायण पाटिल पवार, उपाध्यक्ष - पै.गणेश पाटिल कल्याणकर, पै.हनमंत पाटिल मोरे, सचिव- शहाजी पाटिल पवार, प्रसिद्धी प्रमुख- पत्रकार अंबादास पाटिल पवार, केशव पवार, इमाम लदाफ, सहसचिव- दिलीप कानोडे, कोषाध्यक्ष- सुर्यकांत गायकवाड, सहकोषाध्यक्ष- राजेश बोडके, मिरवणूक प्रमुख- बंटी मुरकुटे, शांतता समिती प्रमुख- अनिल धुतमल, रवि वाघमारे तर सदस्य म्हणून बाळासाहेब कळकेकर, पिराजी पवार, गणपत केंद्रे आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.

          सदरील बैठकीस कृषी उत्पन्न  बाजार समितीचे संचालक किरण वट्टमवार, केशवराव मुकादम, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, नगरसेवक भास्करराव पाटील पवार, बालाजी खिल्लारे, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, सचिन चव्हाण, दिपक पाटील कानवटे आदींसह बहुसंख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments