जावलीत जिजाऊंच्या लेकीनी साजरी केली शिव जयंती -

 जावलीत जिजाऊंच्या लेकीनी साजरी केली शिव जयंती -

ज्याचं कतृत्व सुर्या सारख तेजस्वी . रयतेवरची माया चंद्रा सारखी शितल आणि ज्यांचा पराक्रम महासागरा येवढा मोठा आशा जाणता राजाचा जन्मोत्सव सोहळा जावळी तालुक्यातील भणंग गावातील जिजाऊंच्या लेकीनी साजरी केली शिव जयंती .

भणंग ता जावळी जिल्हा सातारा येथील सुकन्या साला बाद प्रमाणे याही वर्षी शिव जयंती साजरी करण्याचे नियोजन केले .

१९ फेब्रुवारी शिव जन्मदिन म्हणून साजरा केला जातो त्या तिथी प्रमाणे शिव जयंती साजरी केली जात आहे त्याचे निमित्त साधून भणंगच्या जिजाऊंच्या लेकी एकत्र येवून मामूर्डी ता जावली येथून शिवज्योत . ढोल ताशच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजी , छ शिवाजी महाराज कि जय अशा गजरात सर्व वातावरण शिवमय बनविले .

शिवज्योतीचे आगमन भणंग मध्ये होताच गावातील सर्व महिलांनी पंचा आरतीने स्वागत करून दर्शनाचा लाभ घेतला .दिवसभर स्पिकरवर शिव शाहिर बाबासाहेब पुरंदरे यांचे पोवाडे चालू होते . त्यात एक या सुकन्यांनी एक सुंदर कार्यक्रम केला तो म्हणजे सर्वात श्रेष्ठ दान अन्नदान हा कार्यक्रम पार पाडला . विविध कार्यक्रम सादर करण्यात आला संपूर्ण गावातून शिव ज्योतीची ढोल ताशा लेझीम काढून मिरवणूक काढण्यात आली छ. शिवाजी महाराज कि जय ' हर - हर महादेव ' जय भवानी जय शिवाजी च्या गजरात परिसर दमदमून .

या वेळी हनुमान उदय मंडळाचे सदस्य प्रशांत जाधव सतेज जगताप , सरपंच गणेश जगताप ' मा जिल्हा परिषरेचे सदस्य मच्छिद्रनाथ क्षीरसागर माजी सरपंच सुहास जाधव सुधीर जाधव ' माजी अध्यक्ष अविनाश जाधव ' आणि फौजी शंकर जगताप ' प्रतिक पंडीत आणि माजी सरपंच सौ सुलोचना जाधव व महिलावर्ग ग्रामस्थ उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.