Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिरोळ पोलीस ठाणे अंतर्गत चालणाऱ्या अवैध धंदेवाल्यांना पोलिसांची NOC?; अनेकांचे संसार उघड्यावर उध्वस्त.

 शिरोळ पोलीस ठाणे अंतर्गत चालणाऱ्या अवैध धंदेवाल्यांना पोलिसांची NOC?; अनेकांचे संसार उघड्यावर उध्वस्त.

-----------------------------------------------------------
प्रतिनिधी/नामदेव भोसले
-----------------------------------------------------------

शिरोळ पोलीस ठाणे अंतर्गत चालणाऱ्या अवैध धंदेवाल्यांना पोलीस ठाणे कडून NOC मिळालेने सर्व अवैध धंदे छुप्या पध्दतीने सुरू करण्यात आले आहेत.अशी चर्चा शिरोळ शहरातील चौका चौकातून दबक्या आवाजात सुरू आहे. यामागचे गौडबंगाल काय काही दिवसांपूर्वी पदभार स्विकारला छोट्या छोट्या कारवाया करुन आपण सक्षम आसल्याचा आव आणत वरिष्ठांना दाखवून द्यायचे आणि  छुप्या पध्दतीने धंदे सुरू ठेवा अशी NOC द्यायची मग हा दिखाऊ पणा कशाला करायचा अशी प्रतिक्रिया सर्व सामान्य जनतेतून होत आहे.गेल्या काही दिवसापासून कमी गुंतवनुक करुन जास्त नफा कसा कमावयचा याची मानसिकता तरुणाई मध्ये निर्माण होत असलेने अनेक तरुणांचा कल या अवैध धंद्याकडे वाढत चालला असलेचे दिसून येते.त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यात वाढ होताना दिसते   अवैध धंद्याकडे वाढलेला तरूणांचा कल व पोलीसांकडून होणारे दुर्लक्ष यामुळे जणू अवैध धंद्यांना मोकळे रानच मिळाले आहे.त्यामुळे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावा गावात छुप्या पध्दतीने वाढणारेअवैध धंदे यामुळे अनेकांचे  संसार उघड्यावर पडले आहेत.अखंड तरुणाई या अवैध धंदेवाल्यां मुळे बरबाद होत चालली आहे.या अवैध धंदेवाल्यांचा बंदोबस्त करण्याऐवजी पोलिसांनी त्यांना छुप्या पध्दतीने धंदे करण्यासाठी जणू NOC च दिली आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.  पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या शहरातील   अर्जुनवाड रोड अगर भाग नांदणी.  नाका या ठिकाणी मटका, हातभट्टी दारू,गांजा लाँज,वडाप तसेच अवैध रित्या गँस भरणे,हातभट्टी दारूच्या भट्या राजरोस पणे सुरू आहेत.शहर व ग्रामीण भागातील तरुण   बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर कमी गुंतवणुकीचा व्यवसाय म्हणुन पाणठेला किंवा चहाची टपरी अशा व्यवसायाकडे वळत होते. मात्र,आता कमी गुंतवणुकीत जादा नफा कमावण्याच्या नादात बेरोजगार तरुणांनी आपला मोर्चा छुप्या पध्दतीने सुरू असलेल्या  जुगार,मटका,दारु,गांजा अशा अवैध धंद्याकडे वळल्याचे दिसून येते तसेच तरुणांसोबत  शासकीय सेवेतील कर्मचारी देखील सट्ट्याच्या आहारी गेलेचे दिसून येते अशा धंद्यात  पैसा मिळवण्यापेक्षा गमावणाऱ्यांची संख्या वाढत चाललेने त्यातुनच कर्जबाजारीपणा आणि नशेच्या आहारी जाणारे तरुण अनपेक्षितपणे गुन्हेगारी कडे ही वळत आहे.या सट्टा पट्टीच्या नादी लागुण कित्येक तरुण दिवसभर आकडे मोडीच्या गणिताचा अभ्यास करीत असतात. शहरात कित्येक सट्टा पट्टी दलालांनी पट्टी घेण्याचे कार्यालय लावलेले आहे. या अवैध धंद्यांनी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केले आहेत.तरीही या धंद्याच्या नादी लागणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसून येत नाही.या व्यवसायाबद्दल आरडाओरड झाल्यास वरिष्ठांकडून कारवाई करण्याचे आदेश होतात मग छोट्या मोठ्या प्रमाणात कारवाई करुन आपण सक्षम असलेचा आव आणून हे वरिष्ठांना दाखवले जाते.नंतर काही दिवस अवैध धंदे छुप्या पद्धतीने घेण्यासाठी धंदेवाल्यांना आतून आदेश होतात.त्यानंतर मग काय "ते"आणि "हे" एकत्र येतात आणि जैसे थे परिस्थिती राहते.अशा या जयसिंगपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजरोस पणे छुप्या पध्दतीने सुरू असणार्या अवैध व्यवसायावर  पोलिस ठाण्याकडून  कोणत्याही कार्यवाही होत नसल्याचे 

 अवैध व्यवसायकामध्ये "जित "असल्याचे

दिसून येते.याची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा पोलिस प्रमुखांनी   सबंधित धंदेवाले व त्यांची पाठराखण करणार्यां कर्मचाऱ्यांवर  योग्य ती  कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत  आहे.

 शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आलेल्या कर्तव्यदक्ष अधिकारी अवैध व्यवसायातील लोकांची मदत घेत राहणार का असा प्रश्न शहरात चर्चिला जात आहे

Post a Comment

0 Comments