ऍड. प्रकाशजी आंबेडकर यांची 06रोजी नवी मुंबई मधील नेरुळ मध्ये जाहीर सभा.

 ऍड. प्रकाशजी आंबेडकर यांची 06रोजी नवी मुंबई मधील नेरुळ मध्ये जाहीर सभा.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

नवी मुंबई प्रतिनिधी 

रवि पी. ढवळे 

---------------------------

नवी मुंबई :- नवी मुंबई वंचित बहुजन आघाडी जिल्हाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर यांची जाहीर सत्ता परिवर्तन महासभा बुधवार,06रोजी सायंकाळी 05वाजता नेरुळ येथील रामलीला मैदान सरसोळे सेक्टर -12येथे होणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हाअध्यक्ष दिलीप बंदिचोडे यांनी सांगितले आहे.


या सत्ता परिवर्तन महासभेमध्ये ऍड. प्रकाशजी आंबेडकर यांच्यासह, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, युवक प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, यांचे उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे. तरीही या महासभेला नवी मुंबई तमाम आंबेडकरी जनता, बहुजन समाजातील सर्व घाटकातील लोकांनी उपस्थित राहुन ही सत्ता परिवर्तन महासभा यशस्वी करावी असे अहवान जिल्हाध्यक्ष दिलीप बंदिचोडे, जिल्हा सचिव गौतम शिलवंत, ऐरोली ता. महासचिव राजेश भालेराव,व जिल्हा पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.