Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोणंद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी 14 वर्षापासून घरपोडी मधील फरारी असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात.

 लोणंद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी 14 वर्षापासून घरपोडी मधील फरारी असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात.

-----------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोणंद प्रतिनिधी 

------------------------

      लोणंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर 98/2010 भादवि. 457, 380 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हे अंतर्ग सदर गुन्हयातील आरोपी नामे चोच्या ऊर्फ शुभम राज्या शिंदे वय 38 रा. शेळकेवस्ती लोणंद ता. खंडाळा जि. सातारा याने गुन्हा केलेपासुन तो अदयपर्यंत फरारी होता. सदर आरोपीचा शोध घेणेकामी सपोनि श्री सुशिल भोसले यांनी वरीष्ठांचे मागदर्शनाखाली पोहवा संतोष नाळे बनं. 1200, पोहवा. नितीन भोसले बनं. 473, पोना बापु मदने बनं. 1151, पोकों. विठठल काळे बनं.

1483, पोकॉ. अभिजित घनवट बनं. 2395, यांचे पथक नेमले होते. आरोपी चोच्या ऊर्फ शुभम राज्या शिंदे हा त्याचे घरी दिनांक 26/3/2024 रोजी येणार असल्याची माहीती मिळाल्याने सपोनि श्री सुशिल भोसले यांचे मागदर्शनाखाली वरील

पथकातील अंमलदार यांनी शेळकेवस्ती लोणंद येथे त्याचे राहत्या घराचे आजुबाजुला सापळा रचला. सकाळी 9.00 वाजताचे सुमारास फरारी आरोपी चोच्या ऊर्फ शुभम शिंदे हा घरी आला त्यावेळी पथकातील अंमलदार यांनी एकाचवेळी कारवाई करुन अचानक त्याचे घरी झडप टाकली व फरारी आरोपी चोच्या ऊर्फ शुभम शिंदे याला ताब्यात घेतला. त्याला पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचे अटकेची कारवाई केली व त्यानंतर आरोपीस मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधीकारी फलटण न्यायालय येथे रिमांड रिपोर्टसह हजर ठेवले असता त्याची 14 दिवस न्यायालयीन अभिरक्षा मंजुर झालेली आहे.

     सदरची कारवाई ही समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री सुशिल भोसले सहा. पोलीस निरीक्षक, पोहवा संतोष नाळे, पोहवा. नितीन भोसले, पोना बापु मदने, पोकॉ. विठठल काळे, पोकॉ. अभिजित घनवट यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.

Post a Comment

0 Comments