शाहूपूरी पोलीसां कडुन 24 तासात घरफोडी उघड चोरट्यासह 79,000 मुद्देमाल ताब्यात.
शाहूपूरी पोलीसां कडुन 24 तासात घरफोडी उघड चोरट्यासह 79,000 मुद्देमाल ताब्यात.
---------------------------------फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
---------------------------------
शाहुपुरी पोलीस ठाणे कोल्हापुर गु.र.नं 222/2024 भा. द. वी. स कलम 454,457, 380 प्रमाणे दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात शाहुपुरी पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकास यश आले दिनांक 03/03/2024 रोजी रात्री 10.00 वा ते दि. 04/03/2024 रोजी सकाळी 09.00 वा चे दरम्यान मुदतीत कोल्हापूर येथील शाहुपूरी पाच बंगला येथील एच डी एफ सी बँकेचे बाजुस असले राम मोबाईल शॉपीचे शटरचे लॉक तोडून त्यामधील वेगवेगळे कंपनीचे मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरले बाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना शाहूपूरी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकातील अंमलदार शुभम संकपाळ व बाबासाहेब ढाकणे यांना गोपनीय बातमी दारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती की सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी राज उर्फ रविराज महेश कसबेकर वय - 27 रा. टेंबलाईनाका 02 नं गेट, झोपडपट्टी, कोल्हापुर याने केला असून सदर आरोपी हा चोरीचे मोबाईल विक्रीसाठी मध्यवर्ती बस स्थानक, कोल्हापूर येथे येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाले नंतर मध्यवर्ती बसस्थानक पारीख पुल कोल्हापूर येथे दि. 05/03/2024 रोजी सापळा रचून आरोपी राज उर्फ रविराज महेश कसबेकर वय -27 रा. टेंबलाई नाका 02 नं गेट, झोपडपट्टी, कोल्हापूर यास ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यात वेगवेगळया कंपनीचे 13 मोबाईल मिळून आले त्याचे कडे चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर सदर चोरट्यास अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने सदरचे मोबाईल हे पाच बंगला, शाहूपूरी कोल्हापूर येथील एका मोबाईल शॉपी च्या शटरचे लॉक तोडून चोरी केले असल्याचे सांगितले सदर चोरट्याच्या ताब्यातून या चोरीच्या गुन्हयातील 79,000/- हजार रुपये किंमतीचे 13 मोबाईल जप्त केले आरोपी सराईत गुन्हेगार असून या पुर्वी त्याचेवर शाहूपुरी, राजारामपुरी, गांधीनगर पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल
आहेत.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक महेद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी अजीत टिके पोलीस निरीक्षक अजय सिकंदर याचे मार्गदर्शनाखाली सहा फौजदार संदिप जाधव पोलीस अंमलदार मिलींद बांगर, शुभम संकपाळ, लखन पाटील, बाबासाहेब ढाकणे, विकास चौगुले, रवी अंबेकर महेश पाटील यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना 416 विरेंद्र वडेर हे करीत आहेत.
Comments
Post a Comment