निवडणूक आचारसंहितेमध्ये लोहा पोलिसांची धडक मोहीम. दारू जुगाराचे आठ ठिकाणी छापे 3 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त.14 आरोपी अटक, 11 गुन्हे दाखल.
निवडणूक आचारसंहितेमध्ये लोहा पोलिसांची धडक मोहीम. दारू जुगाराचे आठ ठिकाणी छापे 3 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त.14 आरोपी अटक, 11 गुन्हे दाखल.
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
लोहा प्रतिनिधि
अंबादास पवार
-------------------------
दि.24 व 25 /3/2024 रोजी लोहा पोलिसांनी निवडणूक आचारसंहिता निमित्ताने आणि होळी धुलीवंदन सणाच्या निमित्ताने लोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारी मध्ये लोहा पोलिसांनी अवैध दारू बाळगणाऱ्या सात आरोपींना पकडून त्यांच्याकडून दारूचा एकूण 1 लाख 52 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तर 10 आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे पोलीस स्टेशनला सात गुन्हे दाखल केले.
दारू विक्रीतील 10 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया करून नंतर सोडले.
एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून चार आरोपींना पकडले त्यामध्ये 1 लाख 37 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपी विरोधात जुगार खेळत व खेळवत असल्याबाबत जुगार अधिनियम 12 अ प्रमाने गुन्हा दाखल केला.
लोहा पोलिसांनी शहरात पण विविध ठिकाणी नाकाबंदी सुरू केली असून मोठ्या प्रमाणामध्ये वाहन चेकिंग सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चिंचोलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी केंद्रे साहेब सपोनी काळे मॅडम पीएसआय रोडे साहेब पीएसआय निवळे साहेब पीएसआय नाईक साहेब पोलीस अंमलदार किरपणे वरपडे डफडे एज्युलकुंटे राठोड मेकलवाड गुट्टे संदीप कदम व होमगार्ड यांनी केली.
Comments
Post a Comment