Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पोकलॅण्ड मशीनव्दारे आजअखेर 50 डंपर गाळ उठाव.

 पोकलॅण्ड मशीनव्दारे आजअखेर 50 डंपर गाळ उठाव.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर महानगरपालिका प्रतिनिधी 

कु.रजनी  कुंभार 

-----------------------------

कोल्हापूर ता.21 : महानगरपालिके आरोग्य विभागामार्फत शहरात मान्सुपुर्व नालेसफाईचे काम सुरु केले आहे. मुख्य 13 नाल्यांची सफाई महानगरपालिकेच्या 2 पोकलॅण्ड मशीनद्वारे व 2 जे.सी.बी मशीनद्वारे 206 नाल्यांची सफाई व 40 कर्मचारी यांचे मार्फत 476 छोटया नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. 2 पोकलॅण्ड मशीनव्दारे गाडीअड्डा व हुतात्मा पार्क येथून मुख्य नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. या पोकलॅण्ड मशीनद्वारे आजअखेर 50 डंपर गाळ नाल्यातून काढण्यात आला आहे. तर 2 जे.सी.बी मशीनव्दारे मलईगीरी अपार्टमेंट, कदमवाडी रोड, विक्रमनगर, धान्य गोडावुन या परिसरात नाले सफाईचे काम सुरु करण्यात येत आहे. मनुष्यबळाव्दारे आतापर्यंत शहरातील भोसलेवाडी, कदमवाडी, महाडीक वसाहत, रुईकर कॉलनी, साळोंखेनगर, शायकीय मध्यवर्ती कारागृह परिसर, रायगड कॉलनी- जरगनगर, सुर्वेनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, जिवबानाना जाधव पार्क अशा 10 प्रभागांची छोटया नाल्यांची स्वच्छता करण्यात आलेली आहे. आजअखेर मनुष्यबळाव्दारे 476 नाल्यापैकी आजअखेर 69 नाल्यांची सफाई करण्यात आली आहे. उर्वरीत सर्व नालेसफाईचे कामकाज दि.15 मे 2024 पर्यंत पुर्ण करण्यात येणार असल्याचे नियोजन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments