Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

उधारी मागितली म्हणून डोक्यात लोखंडी खुर्ची घातली.गांधीनगर मधील प्रकार.

 उधारी मागितली म्हणून डोक्यात लोखंडी खुर्ची घातली.गांधीनगर मधील प्रकार.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार.

-----------------------------------

गांधीनगर मध्ये असलेल्या शांती साडीच्या दुकानासमोर दुपारी 3.30 च्या सुमारास उधारीचे पैसे मागितले म्हणून डोक्यात लोखंडी खुर्ची घालून रमेश रावसाहेब व व 32 रा वळीवडे या युवकावर जिवघेणा हल्ला करण्यात आला या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली

या घटनेची पार्श्वभूमी अशी की उधारीचे पैसे घेण्यासाठी रवी रावसाहेब आपल्या भावासोबत शांती साडीच्या दुकानासमोर गेले असता त्यानी दिलीप होटवाणी रा गांधीनगर यांच्या कडे उधारीच्या पैशाची मागणी केली त्यावेळी होटवाणी यांनी पैसे देण्यास नकार देऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यावेळी रमेश रावसाहेब व दिलीप होटवाणी यांच्यात बाचाबाची झाली त्यावेळी दिलीप होटवाणी यांनी समोर असलेली लोखंडी खुर्ची उचलून रवी यांच्यावर हल्ला चढवला त्यांच्या पाठीमागे असलेल्या रमेश रावसाहेब यांनी रवी यास बाजूला ढकलत असताना होटवाणी यांनी रमेश रावसाहेब यांच्या डोक्यात लोखंडी खुर्ची घालून जखमी केले असल्याची तक्रार गांधीनगर पोलीस ठाण्यात गु.र.न.101/2024 भा द वि स.कलम.324,504 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ 1561कांबळे हे करीत आहेत

Post a Comment

0 Comments