Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी टोटल क्वालिटी पर्सन बनावे- न्यायमूर्ती श्री वाय. डी. कोईनकर.

 विद्यार्थ्यांनी टोटल क्वालिटी पर्सन बनावे- न्यायमूर्ती श्री वाय. डी. कोईनकर.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर

------------------------------

बगडिया महाविद्यालयाचा पदवी वितरण समारंभ.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या निर्देशाप्रमाणे उत्तमचंद बगडिया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 21 मार्चला पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

पदवी वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी रिसोड न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री वाय. डी. कोईनकर , संस्थाध्यक्ष श्री उत्तमचंदजी बगडिया  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते महाविद्यालयातील कला व वाणिज्य पदवीधर विद्यार्थ्यांना पदवीचे वितरण व स्मृतिचिन्ह देऊन  सन्मानित करण्यात आले.तसेच वाणिज्य व अर्थशास्त्र विभागातून प्राविण्यासह गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना स्मृती चिन्हांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी यांनी आपल्या  प्रास्ताविकेतून पदवीधारक विद्यार्थ्यांनी फक्त पदवी घेऊन न थांबता पदवीनंतर उच्च शिक्षण घेऊन उंच भरारी घ्यावी, स्वतःची प्रगती व उत्तमचंद बगडिया महाविद्यालयाचे नाव मोठे करावे  अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले.

न्यायमूर्ती श्री वाय. डी. कोईनकर यांनी सर्वप्रथम महाविद्यालयातील कला व वाणिज्य पदवी घेणारे सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी जीवनाची यशस्वी वाटचाल करण्याकरिता ध्येय ठरवून सूक्ष्म नियोजन करून हातातल्या मोबाईलचा वापर अभ्यासाकरता करून स्वतःची गुणवत्ता वाढवावी व यश संपादन करावे तसेच विद्यार्थ्यांनी टोटल कॉलिटी पर्सन बनावे.डॉ. आंबेडकर व शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचून प्रेरणा घ्यावी व प्रगतीपथावर जावे व उज्वल भविष्य करिता शुभेच्छा दिल्या.


प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष श्री उत्तमचंदजी बगडिया यांनी भविष्यात उच्च शिक्षण क्षेत्रातील बऱ्याच प्रकारच्या पदवीचे वितरण आपल्या महाविद्यालयातून व्हावे अशा प्रकारचा मानस त्यांच्या मनोगतातून व्यक्त केला.तसेच येणाऱ्या पुढील शैक्षणिक वर्षात रोबोटिक लॅब सुद्धा  महाविद्यालयात सुरू होणार असल्याचे सांगितले.

पदवी वितरण समारंभाचे कार्यक्रम समन्वयक व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. ए. जी. वानखडे  यांच्या उत्तम  कार्यशैलीतून व प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. 

कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन डॉ. एम. पी. खेडेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. राम जुनघरे यांनी केले.याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री विठ्ठल वसु , बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व रिसोड न्यायालयातील वकील मंडळी उपस्थित होती.

Post a Comment

0 Comments