संजय गांधी योजनेची नवीन मंजूरीची प्रकरणे आचारसंहितेपूर्वी मंजूर करा.सौ ज्योतीताई गजानन बाजड यांची मागणी.
संजय गांधी योजनेची नवीन मंजूरीची प्रकरणे आचारसंहितेपूर्वी मंजूर करा.सौ ज्योतीताई गजानन बाजड यांची मागणी.
-----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर.
-------------------------
संजय गांधी योजनेची प्रकरणे आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजूर करा अशी मागणी रिसोड तालुका अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ ज्योतीताई गजानन बाजड यांनी केली आहे
केंद्र व राज्य शासनामार्फत गोरगरिब लाभार्थ्यांना तसेच संजय गांधी योजनेद्वारे निराधारांना, विधवा महिला, परित्यकत्या, इंदिरा गांधी योजना, श्रावणबाळ योजना, अपंगासह इतर लाभार्थ्यांना अनुदान दिल्या जाते. अशा अनेक पात्र लाभार्थ्यांना सेतू अंतर्गत लागणारे कागदपत्र जमा करून फाईल तयार करून ऑनलाईन करून सेतूमध्ये जमा केल्या आहेत. तहसील कार्यालयात या सर्वांच्या फाईली जमा करून घेऊन त्या आचार संहिता लागण्यापूर्वी मंजूर कराव्या,
शासनाद्वारे लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये प्रमाणे अनुदान दिल्या जाते. या अनुशंगाने रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांनी फाईल तयार केल्या असून ही प्रकरणे सेतूमध्ये जमा केली आहेत. आता लोकसभेच्या आचार संहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचार संहिता लागू होण्यापूर्वी सदर फाईल जमा करून तसेच पूर्वीच्या त्रृटीतील प्रकरणे सुद्धा निकाली काढावी व गोरगरिबांना न्याय द्यावा, अशी मागणी लाभार्थ्यासह सामाजिक कार्यकर्त्यां , चिंचांबापेन माजी ग्रामपंचायत सदस्य तथा अहिल्यादेवी होळकर महिला प्रतिष्ठान रिसोड तालुकाध्यक्ष सौ ज्योतीताई गजाननराव बाजड यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
Comments
Post a Comment