बोपेगाव ता. वाई येथील कोहिनूर हॉटेल समोर पार्क केलेल्या ट्रॅव्हल्स मधून बॅगलिफटींग करणा-या २ आरोपीना रायबरेली राज्य - उत्तरप्रदेश येथून अटक करुन त्यांचेकडून ८३ लाख,रुपये रोख रक्कम हस्तगत.

बोपेगाव ता. वाई येथील कोहिनूर हॉटेल समोर पार्क केलेल्या ट्रॅव्हल्स मधून बॅगलिफटींग करणा-या २ आरोपीना रायबरेली राज्य - उत्तरप्रदेश येथून अटक करुन त्यांचेकडून ८३ लाख,रुपये रोख रक्कम हस्तगत.

-----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 
सातारा जिल्हा प्रतिनिधी 
अमर इंदलकर 

-----------------------------------
          दिनांक २२/०२/२०२४ रोजी 10 ते 10.30 वा.चे दरम्यान बोपेगाव ता.वाई गावचे हद्दितील हॉटेल कोहीनूर येथे जेवणासाठी स्लीपर कोच ए.सी.डॉल्फीन ट्रॅव्हल्स MP/09/DD/1954. ही थांबलेली असताना फिर्यादी जेवण करणेसाठी हॉटेलमधे गेले त्यादरम्यान सदर ट्रॅव्हल्सचे सीट नंबर २५ एल वर ठेवलेले लगेज बॅग मधील फिर्यादीचे ताब्यातील ९६,००,०००/- (शहान्नव लाख रुपये) सदर ट्रॅव्हल्स मधे प्रवास करणारे दोन अनोळखी प्रवाशांनी चोरुन नेले होते याबाबत भुईज पोलीस ठाणे गु.र.नं ७२/२०२४ भा.द.वि.स कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.
           सदर गुन्हयात चोरीस गेलेली रक्कम मोठी असल्याने समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, बाळासाहेब भालचिम उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग, अरुन देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी सदरचा गुन्हा उघड करण्याच्या सुचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे सदर चोरीचा गुन्हा उघडकीस आणणेकरीता सपोनि रमेश गर्जे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा भुईज चे एक पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकाने घटनास्थळचे आसपासचे सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. त्यामध्ये २ संशयित इसमांच्या हालचाली संशयास्पद आढळुन आल्या. त्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषनावरुन एक संशयित आरोपी हा नवी दिल्ली येथे व दुसरा उत्तरप्रदेश येथे चोरी केल्यानंतर गेल्याची खात्री झाली. त्यानुसार मा. पोलीस अधीक्षक सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक सातारा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वाई तसेच पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे मार्गदर्शनाखाली भुईज पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक नवी दिल्ली येथे आरोपीचा शोध घेणेकरीता रवाना झाले. दरम्यान पोलीस पथक दिल्ली येथे पोहोचल्यानंतर सदर आरोपी १) हसन जुम्मन मोहम्मद वय २२ रा. भवानीगड, महाराजगंज, जिल्हा रायबरेली, राज्य उत्तरप्रदेश हा दिल्ली येथून उत्तर प्रदेशला निघून जात असलेचे समजले, त्याप्रमाणे त्याचा दिल्ली येथून सुमारे ६०० किलोमीटर पाठलाग करत त्याला त्याचे गाव भवानीगड, रायबरेली जिल्हा, राज्य उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेवून त्याचेकडे कौशल्यपुर्वक तपास करुन गुन्हयातील चोरीस गेलेली ८३,००,०००/- (त्र्येऐशी लाख रुपये) रोख रक्कम हस्तगत केली आहे. त्यानंतर त्याचेकडे विचारपुस करुन गुन्हयातील दुस-या आरोपी नामे २) इस्तियाक जान मोहम्मद वय २१ वर्ष, रा. पडरिया, महाराजगंज, जिल्हा रायबरेली, राज्य उत्तरप्रदेश याचा शोध घेवून त्यालाही पडरिया, महाराजगंज रायबरेली जिल्हा, राज्य उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेतले आहे. गुन्हयातील तीसरा आरोपी सदर ट्रॅव्हल्सचा क्लिनर याचा शोध सुरु आहे.
       अशा प्रकारे गुन्हयातील दोन अनोळखी आरोपींना निष्पन्न करुन त्यांना परराज्यातुन अटक करुन त्यांचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेल्या रक्कमेपैकी ८३,००,०००/- (त्र्येऐशी लाख रुपये) रोख रक्कम हस्तगत करण्यात भुईज पोलीसांना यश मिळाले आहे. मागिल १ वर्षात भुईंज पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने खुनाचे ३ गुन्हे, जबरी चोरीचे ४ गुन्हे, घरफोडीचे ४ गुन्हे, डिपी चोरीचे ८ गुन्हे, मोटर सायकलचे १२ गुन्हे, चोरीचे ४ गुन्हे असे एकुण ३५ गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये एकुण २,३०,१००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, २,३९,०००/- रुपये किंमतीचे तांब्याची तार,६,००,०००/- रुपये किंमतीच्या १२ मोटर सायकल, ५५,०००/- किंमतीचे ४ मोबाईल तसेच १,०३,७९,४२१/- रुपये रोख रक्कम असा एकुण १,१५,०३,५२१/- (एक कोटी, पंधरा लाख, तीन हजार, पाचशे एकवीस) रुपये किंमतीचा माल हस्तगत केला आहे.






        समीर शेख भापोसे पोलीस अधीक्षक सातारा, आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, बाळासाहेब भालचीम उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई, अरुण देवकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे, पो.उप-नि. विशाल भंडारे, पोउनि रत्नदिप भंडारे, पोलीस अंमलदार वैभव टकले, नितीन जाधव, सोमनाथ बल्लाळ, रविराज वर्णेकर, सागर मोहिते, किरण निंबाळकर, राजेश कांबळे, अजय जाधव तसेच सातारा सायबर सेलचे पोलीस अंमलदार यांनी या कारवाईत सहभाग घेतला असुन कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा व अप्पर पोलीस अधीक्षक सातारा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांनी अभिनंदन केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.