Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोहा वळण रस्त्यालगत आयशर उलटला ; वाहनाचे आणि द्राक्षांचे लाखों रुपयांचे नुकसान.

 लोहा वळण रस्त्यालगत आयशर उलटला ; वाहनाचे आणि द्राक्षांचे लाखों रुपयांचे नुकसान.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनीधी 

अंबादास पवार 

---------------------------------

            मागील दोन ते तीन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ चे रस्ता काम सुरू असून लोहा शहरातील नांदेड ते लातूर महामार्गावरील लोहा वळण रस्त्याचे अर्धे काम पूर्ण झाले, मात्र अर्धे काम ठप्प पडल्याने लातूर कडून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांना उड्डाण पुलावरून जायचे का सर्व्हिस रस्त्याने जायचे हे समजण्या अगोदरच समोर ठेवलेल्या बॅरीकेटवर किंवा बाजूला वाहने उलटून अपघात होत असल्याचे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. सांगली जिल्ह्यातून नागपूर कडे द्राक्ष घेवून जाणाऱ्या आयचर चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने तो समोरील बॅरीकेटवर अदळण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला उलटला. अयचार मधील द्राक्षे रस्त्यालगत शेतात विखुरल्याने वाहनासह द्राक्षांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने आयशर मधील दोनही चालक बालंबाल बचावले. सदरील घटना दि. ३१ मार्च रोजी रविवारी पहाटे साडेपाच वाजता घडली.

                नांदेड ते लातूर राष्ट्रीय महामार्गावरील लोहा शहरातील वळण रस्ता काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. मात्र लोहा वळण रस्ता (बायपास) हा नांदेड ते कंधार रस्त्यापर्यंत भूसंपादन रक्कम अदा करण्यात आली नसल्यामुळे सदरील रस्ता काम हे पूर्णतः ठप्प पडले आहे. तर कंधार रोड ते बेरळी फाटा या नांदेड लातूर रस्त्याचे काम पूर्ण होवून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. वळण रस्त्यावर लातूरच्या दिशेने लोह्याकडे भरधाव वेगात वाहने धावत आहेत. मात्र वळण रस्त्यावरील जुना लोहा नजीक असलेला बायपास रस्त्यावरील उड्डाण पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे उड्डाण पुलावर जाणारा रस्ता महामार्ग विभागाकडून बंद ठेवलाआला आहे. विशेष म्हणजे रस्ता तयार करणाऱ्या केटीएल कंपनीकडून काम सुरू असलेल्या ठिकाणी व्यवस्थितरीत्या सूचना फलक लावणे गरजेचे असताना त्याठिकाणी केवळ बॅरीकेट लावण्यात आले आहेत. अपघातांची मालिका पाहता महामार्ग विभागाकडून सदर रस्त्यावर घटनास्थळापासून जवळपास ५०० मीटर किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावरून सूचना फलक लावणे बंधनकारक असताना महामार्ग विभागाकडून त्याप्रकारे सूचना फलक लावण्यात आले नसल्याची ओरड वाहन चालकांकडून होत आहे. दि. ३१ मार्च रोजी रविवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ येथून नागपूरकडे द्राक्ष घेवून जाणारा आयशर क्र. यू पी ४१ बी टी ६०२२ च्या चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने सदरील आयचर हा जुना लोह्याजवळील बायपास उड्डाण पूल दरम्यान उलटला त्यात आयचरचे मोठे नुकसान झाले असून आतील द्राक्षे लगतच्या शेतात विखुरल्या गेले. मात्र सुदैवाने जीवित हानी टळली.

                 अर्धवट अवस्थेत असलेला वळण रस्ता तत्काळ पूर्ण करण्यात यावा तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणापासून अर्धा ते एक किमी अंतरापर्यंत ठळक अक्षरात सूचनाफलक लावण्यात येवून संभाव्य अपघात टाळावे असे प्रवाशी, चालकांतून बोलले जात आहे. सदर वाहनाचे चालक हे रामनारायण हे होते तर दुसरे चालक हे रामू यादव असल्याची माहिती मिळते.

Post a Comment

0 Comments