Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विद्या मंदीर कोनोली तर्फ असंडोली शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात.

 विद्या मंदीर कोनोली तर्फ असंडोली शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात.

--------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

पन्हाळा प्रतिनिधी 

आशिष पाटील 

----------------------------

मंगळवार दि. 12/03/2024 रोजी विद्या मंदीर कोनोली तर्फ असंडोली शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध गुण दर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम वार्षिक स्नेह संमेलन उमंग 2024 मोठ्या उत्साहात साजरा केला*. 

 *गावच्या सरपंच मा. सौ. तसलीम पखाली यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मा. श्री युवराज पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात झाली.* *सर्व प्रथम शाळेचे मुख्याध्यापक मा*. *श्री.डी.एम पोवार सर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्री सुहास पाटील सर यांनी सर्व शिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर माजी मुख्याध्यापक ब.पु.कांबळे सर श्री पारधीये सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन शाळेचे अध्यापक श्री डी एस पाटील सर यांनी केले .आभार श्री ए बी पाटील सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.ए डी. गडकर सर, सौ. नंदा जाधव मॅडम, कु. पूजा पाटील मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ,ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य त्याचबरोबर गावातील सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी ,तरुण मंडळाचे कार्यकर्ते ,पालक ग्रामस्थ यांनी मोलाचे योगदान दिले*. 

     *या वेळी शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत शाळेत काम करून गेलेल्या माजी मुख्याध्यापक व शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.*   

 *विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची नृत्ये सादर केली. यामध्ये शेतकरी गीत, कोळी गीत,आदिवासी नृत्य, स्टॅंडिंग डान्स, हिंदी, मराठी, तामिळ चित्रपटातील गाणी, पंजाबी भांगडा,विडंबन नृत्य, लोकनृत्य, लोकगीत ,बालगीत,समूहगीत, कव्वाली, विनोदी वात्रटिका, उखाणे, गवळण असे विविध प्रकारचे केलेले सादरीकरण पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटासह बक्षिसांची अक्षरशः खैरात केली*.

Post a Comment

0 Comments